प्रतिष्ठा न्यूज

2022 चा पिकविमा शेतकऱ्यांना तात्काळ द्या नाहीतर 20 फेब्रुवारी पासुन धरणे आंदोलन- शेतकरी पुत्र समितीचा इशारा

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
नांदेड : प्रधानमंत्री पिकविमा योजना खरीप हंगाम सन 2022 चा नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात व मिडअडवायझरी सिजनचे मंजूर झालेले विमा कंपनीच्या व शासनाच्या वादात विलंब होत असलेली पिकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ वाटप करण्यात यावे. अन्यथा दि.20 फेब्रुवारी 2023 रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे शेतकरी पुत्र समितीने मा. जिल्हाधिकारी नांदेड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
प्रधानमंत्री पिकविमा योजना खरीप हंगाम 2022 मध्ये युनायटेड इंडिया पिकविमा कंपनी कडे शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान होऊन पूर्व सुचना दाखल केलेल्या अशा नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात 25 टक्के आगाऊ रक्कमेसह असे जवळपास 150 कोटी रुपयांच्या वर रक्कम शेतकऱ्यांना पिकविमा म्हणून मंजूर झालेली आहे.पण विमा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शासन नियमानुसार नैसर्गिक आपत्तीची रक्कम व काढणी पश्चातची रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ त्यांच्या खात्यावर जमा करणे बंधनकारक असतांना पिक विमा कंपनी शासन हिस्सा आला नाही म्हणुन शेतकन्यांना वाटप करण्यास विलंब करत असल्याचे सांगत आहे. त्यामुळे शासन व विमा कंपनीच्या वादात शेतकरी माय बाप भरडला जात आहे. तरी मंजूर असलेली पिक विम्याची रक्कम तात्काळ शेतकन्यांच्या खात्यावर टाकण्यात यावी अन्यथा दि. 20 फेब्रुवारी 2023 रोजी मा.जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर शेतकरी पुत्र संघर्ष समितीच्या वतीने धरणे आंदोलन जिल्हयातील शेतकऱ्यांना घेऊन करण्यात येईल. असा इशारा शेतकरी पुत्र समितीचे बालाजी ढोसणे पाटील, बालाजी सांगवीकर, व सरपंच- योगेश पाटील गायकवाड, यांनी दिला आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.