प्रतिष्ठा न्यूज

तासगावसह 4 तालुके दुष्काळी जाहीर करा… खा. संजयकाका पाटील व पालकमंत्री सुरेश खाडे यांची उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : सांगली जिल्ह्यातील तासगावसह कवठे महांकाळ,जत,आटपाडी हें चार तालुके दुष्काळ ग्रस्त जाहीर करावेत या मागणीसाठी काल खासदार संजय काका पाटील व पालकमंत्री सुरेश खाडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.या भेटी दरम्यान खासदार संजयकाका आणि पालकमंत्री सुरेश खाडे यांनी सांगली जिल्ह्यात यावर्षी सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला असून त्यामुळे जिल्ह्यातील शेतीची आणि पिण्याच्या पाण्याची समस्या बिकट बनली आहे, तसेच कोयना धरणातून 12 टी एम सी पाणी जिल्ह्याला मिळावे,व वीज वितरण कंपनीच्या समस्ये संदर्भात चर्चा करून विविध मागण्या केल्या.
जिल्ह्यातील महत्वाच्या प्रश्नावर खासदार व पालकमंत्री यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याने दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.सांगली जिल्ह्यातील तासगाव, कवठे महांकाळ,जत,आटपाडी,हें चार तालुके कायम दुष्काळी म्हणून ओळखले जातात.महामदत या प्रणाली द्वारे केलेले दुष्काळाचे मूल्यांकन हें चुकीचें असून या चारही तालुक्यात 120 दिवसां पैकी फक्त 70 तें 80 दिवसच पाऊस झाला आहे, तरी सुद्धा या तालुक्याचा दुष्काळी तालुक्यात समावेश झाला नाही.तरी सदर चार तालुक्यामध्ये सध्या दुष्काळ सदृश्य परस्थिती असल्यामुळे वस्तुस्थितीचा विचार करून या चारही तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश करावा आणि तालुक्यातील जनतेला न्याय द्यावा अशी मागणी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या कडे केली आहे.तसेच शेतीच्या कामासाठी महावितरण तर्फे मिळणाऱ्या सोयिंचा जिल्ह्यात अभाव असून अनेक ठिकाणी डीपी व तत्सम यंत्रणा जळालेली आहे.त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी असून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्या साठी 73 कोटी 50 लाख रुपये इतक्या निधीची आवश्यक ता असून तो तातडीने मंजूर करण्यात यावा अशी मागणी देखील खासदार संजय काका पाटील व पालकमंत्री सुरेश खाडे यांनी यावेळी केली असून उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी लवकरच यावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले असल्याचे समजते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.