प्रतिष्ठा न्यूज

डॉ. शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसीचे घवघवीत यश; फार्मसीची विद्यार्थीनी कु. निशा इंगळे देशात ५५ वी ; रावसाहेब पाटील यांच्या हस्ते सत्कार

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : तीर्थंकर एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ. शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसी कसबे डिग्रज, सांगलीने GPAT-2024 या परीक्षेमध्ये उत्तुंग यश मिळवले आहे. कॉलेजची विदयार्थीनी कु. निशा इंगळे हिने संपूर्ण भारतात (AIR) 55 वा नंबर मिळवला आहे. ती पश्चिम महाराट्रात सर्वोत्तम गुण मिळवणारी विदयार्थीनी असुन तिने नायपर जीईई मध्ये सुध्दा भारतात एम.टेक साठी २९ व एम.एस/एम. फार्म साठी ३२१ वा नंबर मिळवला आहे. त्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. या महाविदयालयातील २५ पेक्षा जास्त विदयार्थ्यांनी GPAT-2024 या परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. या विदयार्थाना एम. फार्मसी अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळून त्यांना शासनाकडून स्कॉलरशिप / स्टायफंड मिळणार आहे.

हे महाविदयालय सन २०१६-१७ पासुन सुरू असून बी. फार्मसी अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता १००, डी. फार्मसी प्रवेश क्षमता ६०, एम. फार्मसी प्रवेश क्षमता (फार्मास्युटीक्स – १५, फार्मास्युटीकल केमिस्टी – १५, फार्माकोलॉजी -१५) अशी आहे. सन २०२४-२५ पासून संशोधन केंद्रास (Ph.D) शिवाजी विदयापीठाकडून मान्यता मिळाली आहे. सदर महाविदयालयामध्ये समाजपयोगी संशोधनाचे काम यशस्वी रित्या चालू असून अल्पावधीतच फार्मसी क्षेत्रातील अग्रगण्य महाविदयालय म्हणून नावलौकिक मिळवला आहे.

या प्रसंगी संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब पाटील, संस्थापक प्रा. डी.डी. चौगुले सर यांनी कु. निशा इंगळे हिचा सत्कार केला. त्यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन. श्री. पोपटराव डोर्ले, सचिव. श्री. अजितप्रसाद पाटील, संचालक. श्री. महावीर चौगुले, श्री. प्रशांत अवधुत, श्री. अजित फराटे, श्री. सुर्दशन शिरोटे, स्वदेशी ट्रस्टचे सागर पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राचार्य डॉ. किरण वाडकर यांनी केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.