प्रतिष्ठा न्यूज

लोढ्याच्या ताकारी कॅनॉलवरील पूल डांबरीकरणाचा भाजपा नेते प्रभाकर पाटील यांच्या हस्ते प्रारंभ

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगाव सावळज मार्गावर ताकारी योजनेचा कॅनॉल रस्त्यावरून गेला आहे. या पुलाचे रुंदीकरण भराव डांबरीकरण नसल्याने येथून वाहन चालवताना वाहनधारकांची कसरत होत होती. एसटी बसेस घसरणे तसेच ऊस वाहतूक ही व्यवस्थित होत नव्हती.सोळा लाख निधी मंजूर असून या विभागाकडे अनेकदा पत्रव्यवहार करूनही हा विभाग ढिम्म होता.खासदार संजय काका पाटील यांनी लोकांची गैरसोय होते,पुलाच्या डांबरीकरण कामास सुरुवात करा असे सांगत अधिकाऱ्यांना सुनावले होते.शनिवारी या कामाचे उद्घाटन भाजप नेते प्रभाकर बाबा पाटील यांच्या उपस्थितीत झाले.यावेळी भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष नेताजी पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.त्याच्या मुरमीकरण कामाची प्रभाकर बाबा पाटील यांनी पाहणी केली,तसेच लोंढे तलावाच्या सांडव्यात तुटलेल्या बंधार्‍याची पाहणी करत यासाठी प्रस्ताव द्या निधी मंजूर करून पुलाचा प्रश्न कायमचा निकाली काढू असे त्यांनी सांगितले.येथील हनुमान मंदिरासाठीही पहिल्या टप्प्यात सात लाख रुपयांचा निधी त्यांनी दिला आहे.यावेळी विकास बुधे विश्वास पाटील नेताजी पाटील राजेंद्र पाटील संतोष निकम विलास बुदे अमोल पाटील शिवाजी कांबळे जनार्दन पाटील बंडू करोडे दादासाहेब पाटील अशोक पाटील रवी रुपनर प्रकाश ठोंबरे प्रकाश पाटील सचिन पाटील विजय गुरव बंडू गुरव बंटी बुधे बंडू मंडले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.