प्रतिष्ठा न्यूज

जगदंब फौंडेशनचे रक्तदान शिबिर उत्साहात; १०२ जणांनी केले रक्तदान, महिलांचाही सहभाग

प्रतिष्ठा न्यूज / किरण कुंभार
तासगाव : सावर्डे येथे जगदंब फाउंडेशनच्यावतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी १०२ रक्तदात्यांनी प्रतिसाद दिला. यामध्ये ५ महिलांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

शैक्षणिक, सामाजिक कार्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्याचा मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त सत्कार करण्यात आला. गेली १० वर्षे हा कार्यक्रम चालू आहे. जि. प. शाळा सावर्डे हॉलमध्ये सरपंच उल्का माळी व पै. संभाजी (तात्या) पाटील याचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. इयत्ता १० वी, १२ वीतील गुणवंत मुला मुलीचा तसेच एमपी एससी परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. यावेळी महिला शेतीगट यांनी तालुका पातळीवर प्रथम क्रमांक मिळवला त्यांचाही सत्कार करण्यात आला. सत्कारासाठी आंब्यांचे झाड देऊन वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला. जगदंब सोशल फौंडेशनचे अध्यक्ष सुभाष पाटील यांनी मनोगत

व्यक्त केले व भविष्यकालीन सामाजिक उपक्रम आणखी वाढवू याची ग्वाही दिली. पोलाद स्टील या कंपनीने रक्तदात्याना भेटवस्तू दिल्या. यासाठी कंपनीचे ऑफिसर विशाल पाटील यांनी सहकार्य केले. तसेच मिरज मेडिकल कॉलेजचेही योगदान लाभले.
यावेळी समाजसेवक राजाराम माने सर, पै संभाजी तात्या पाटील व सरपंच माळी मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पंचायत समिती सदस्य अमोल माळी, वेदाणे व्यापारी लक्ष्मण पाटील, डॉ अच्युत जाधव, इंजिनीअर सुरेश साखरे, निशिकांत माने, संजय माने, तंटामुक्ती अध्यक्ष अजिंक्य पाटील, समाजसेवक प्रियदर्शन कांबळे, माजी उपसरपंच माणिक माने, दादासो मानेगुरुजी, ग्रामपंचायत सदस्या शिंदेमॅडम, जगदंबचे सर्व सदस्य व गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. निवेदन सुभाष जाधवसर यांनी केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.