प्रतिष्ठा न्यूज

कौठा ता.कंधार येथे अखंड दत्तनाम सप्ताह व दत्तजयंती सोहळ्यास प्रारंभ

प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार
नांदेड दि.3 : कौठा ता.कंधार येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही आनंद सांप्रदाय दत्त संस्थान कौठा यांच्या भक्ती सौजन्याने व श्री सदगुरू १०८ स्वामी गंभीरबन महंत महाराज दत्त संस्थान कोलंबी यांच्या कृपेने व गुरुभक्त अमरपदवासी गोविंदराव संभाजी देशमुख यांच्या ज्वलंत गुरुभक्ती प्रेरणेने अखंड दत्तनाम सप्ताह व दत्त जयंती सोहळ्यास सुरुवात झाली या सोहळ्यातील दैनदीन कार्यक्रम पूढील प्रमाणे आहेत.
सकाळी बाळक्रिडा ग्रंथाचे पारायण दुपारी महापूजा व रात्री किर्तन पूढील प्रमाणे दि.१ डिसेंबर द.भ.प. साहेबराव पाटील गोळेगावकर दि.२ डिसेंबर रोज शुक्रवार द.भ.प. पांडूरंग गादगे किवळेकर दि.३ डिसेंबर द.भ.प. प्रताप पाटील पिंपळकौठेकर ४ डिसेंबर द.भ.प. कोडींबा पाटील चिखलीकर ५ डिसेंबर द.भ.प. मारोती पाटील शंकरगावकर ६ डिसेंबर नागोराव पाटील आलेगावकर ७ डिसेंबर रोजी सकाळी महाप्रसाद द.भ.प. बालाजीराव देशमुख गुरुजी कौठेकर यांचे दत्तजयंती पर किर्तन व नंतर लगेचच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजक बसवंत गोविंदराव देशमुख व आनंद दत्त सांप्रदाय कौठा यांनी सांगीतले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.