प्रतिष्ठा न्यूज

श्रेयवादापेक्षा जनतेच्या सोयीसाठी भव्य इमारत उभी राहते याचा आनंद.. तासगाव पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या भूमीपूजन प्रसंगी खासदार संजय काका यांचे प्रतिपादन

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन खासदार संजयकाका पाटील व आमदार सुमनवहिनी पाटील यांच्या शुभहस्ते नुकतेच संपन्न झाले.यावेळी आपल्या पंचायत समितीला एक गौरवशाली परंपरा आहे,पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या कामाच्या अनुभवावर आजवर झालेल्या आमदारांनी तालुक्यासाठी अतिशय उत्कृष्ट काम केले आहे,श्रेयवाद करणे ही आपल्या तालुक्याची परंपरा नाही, लोकप्रतिनिधी आपल्या सातबारा उताऱ्यावर कर्ज काढून शासनाकडून निधी उपलब्ध करून आणत नाहीत ते आमचे कर्तव्यच आहे,कै.आर आर आबांच्या बरोबर टोकाचा संघर्ष झाला परंतु विकास कामात कधीही अडथळा आणण्याचा प्रयत्न आम्ही केला नाही असं खासदार संजय काका पाटील म्हणाले.
यावेळी बोलताना आमदार सुमनवहिनी पाटील म्हणाल्या
आर आर आबांनी तासगावात प्रशासकीय इमारत उपलब्ध करून दिली त्यामुळे अनेक कार्यालये एका छता खाली आली,पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन त्याचाही उपयोग सर्वसामान्यांना व्हावा.
यावेळी माजी समाजकल्याण सभापती प्रमोद शेंडगे,माजी सभापती संजय जमदाडे,संतोष आठवले यांचीही भाषणे झाली.यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल,कार्यकारी अभियंता भारती बिरजे,प्रभारी गटविकास अधिकारी डॉक्टर संताजी पाटील,उप अभियंता विश्वास नाईक, आर्किटेक्ट मोहित चौगुले,कॉन्ट्रॅक्टर सुरेश साखरे,संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सुखदेव पाटील, माजी सभापती सुनील पाटील, कमलताई पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील,बंडू पवार,संभाजी पाटील,विश्वासराव पाटील,डी के पाटील,बाबासाहेब पाटील,अमोल शिंदे,हणमंत पाटील, उमेश पाटील,आर डी पाटील,युवराज पाटील,गजानन खुजट,मनिषा माळी,
माया एडके,शशिकांत जमदाडे, दिलिप पवार,जयंत पाटील,आबा माळी,पवन जाधव,विनय सपकाळ, गणेश पाटील,विजय पाटील,पंचायत समितीचे सर्व अधिकारी विविध गावचे सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.