प्रतिष्ठा न्यूज

तासगाव पालिकेकडून थकबाकीदारांची 60 कनेक्शन बंद..एकाच दिवसात 24 लाख करवसुली मुख्याधिकारी पाटील

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगाव नगरपरिषदेच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी धडक मोहीम राबविली जात आहे. शासनाकडून वसुलीचे 100 टक्के उद्दीष्ट पूर्ण करण्याचे निर्देश आल्याने व वसुलीवरच नगरपरिषदेस विकास कामांसाठी मिळणारे अनुदान अवलंबून असल्याने ही मोहीम राबविण्यात येत आहे.या मोहिमेत कारवाई करण्यासाठी श्वेता कुंडले, धनश्री पाटील,डॉ.चेतना साळुंखे, राजेंद्र काळे,राजेंद्र माळी,संतोष गायकवाड,प्रवीण धाबुगडे,सर्व विभाग अधिकारी व कर्मचारी यांचे पथक तयार करुन थकबाकीदारांची नळ कनेक्शन बंद करण्याची मोहीम प्रभाविपणे राबविण्यात येत आहे. आजअखेर थकबाकीदारांची 60 नळ कनेक्शन बंद करण्यात आलेली आहेत.नागरिकांनी कारवाई टाळण्यासाठी घरपट्टी व पाणीपट्टी कराची रक्कम तातडीने भरावी व नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.तसेच 3 मार्च रोजी झालेल्या लोकअदालत मध्ये जवळपास 400 थकबाकीदारांना मे.न्यायालयाद्वारे कायदेशीर कारवाईची नोटीस देण्यात आलेली होती.त्यापैकी जे थकबाकीदार उपस्थित राहिले नाहीत अथवा ज्यांनी थकबाकी रक्कम नगरपरिषदमध्ये जमा केलेली नाही. त्यांची नावाची यादी प्रसिद्ध करण्यात येईल व पुढील न्यायालयीन कारवाई करण्यात येईल अशी माहिती प्रशासक तथा मुख्याधिकारी मा.पृथ्वीराज पाटील यांनी दिली आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.