प्रतिष्ठा न्यूज

नांदेडच्या दिलीप कदम यांचा महाराष्ट्रात नावलौकीक: कर निरीक्षक परिक्षेत पटकाविला राज्यातून प्रथम क्रमांक

प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार
नांदेड : महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्य कर निरीक्षक या पदासाठी ईडब्ल्यूएस प्रवर्गातून दिलीप मधुकर कदम याने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
कीर्तनकार मधुकर महाराज कदम यांचे पुत्र दिलीप कदम याने २०२२ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत राज्य कर निरीक्षक पदासाठी परीक्षा दिली होती. दिलीप याने ईडब्ल्यूएस प्रवर्गातून ४०० पैकी २७६.५० गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा बारूळ येथे झाले.
अभ्यासात सातत्य व संयमाच्या बळावर यश संपादन करू शकलो. आई वडिलांचा पाठीवर हात असतो तेव्हा कुठल्याही बाह्य प्रेरणेची गरज पडत नाही. नवी आव्हाने स्वीकारून नव्या बदलांना सामोरे जाणे हे आपले कर्तव्य ठरते. याच विचारातून अभ्यासाचे एकत्रित नियोजन केल्याची प्रतिक्रिया दिलीप कदम याने दिली. दिलीप कदम यांनी कर निरिक्षक परिक्षेत राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.त्याबद्ल त्यांचे जिल्ह्यातून अभिनंदन करण्यात येत आहे. प्रतिष्ठा न्यूज पोर्टल कडून हार्दिक हार्दिक अभिनंदन.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.