प्रतिष्ठा न्यूज

ओबीसी, एससी, एसटी व मराठा तरुणांची दाखले देण्यासाठी होणारी अडवणूक थांबवावी व प्राधान्यक्रमाने दाखले दयावे : आमदार सुधीरदादा गाडगीळ

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : महाराष्ट्र सरकारने दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी SEBC प्रवर्ग बनवून मराठा आरक्षण देण्याचानिर्णय घेतला आहे. याबाबत शासनाने जातप्रमाणपत्र व नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्रवाटपाचे आदेश दिलेले आहेत. सध्या स्थितीला शासनाने अनेक विभागाच्या नोकर भर्तीसंदर्भात जाहीरात बदलून SEBC पर्याय उपलब्ध करुन दिलेला आहे. याशिवायकाल घोषीत झालेला 12 वी निकाल लक्षात घेता लवकरच शैक्षणीक प्रवेशाला सुरुवात होणारअसल्याने शासकीय सेवेसाठी अर्ज करणारे सर्व उमेदवार व शैक्षणीक प्रवेश यासाठीई-सेवा केंद्राकडून दाखले देण्यास विलंब केला जात असून सदर प्रकरणे तहसीलदार कार्यालयात प्रलंबीत असल्याचे सांगण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी वारंवार येत होत्या, हीच अवस्था सर्व समाजातील लोकांच्या बाबत आहे. समाज कल्याण विभाग जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिति सांगली या समिति कडून देखील जात प्रमाणपत्रदेण्याकरिता कारणे देऊन विलंब केला जातो. यासाठीच आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांची भेट घेऊन निवडणूक आचारसंहितेच्या नावाखाली दाखले द्यायला होत असलेला विलंब दूर करण्यासाठी आपणाकडून सर्व तालुका तहसीलदार यांना आदेश देण्यात यावेत, व प्राधान्यक्रमाने जात प्रमाणपत्र, नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र,  रहीवासी दाखला, अशी महत्वाची कागदपत्रे जलदगतीने देण्याच्या सूचना कराव्यात असे सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आमदार सुधीर दादाना सांगितले की, प्राधान्यक्रमाने सर्वाना दाखले दिले जातील. व  कोणाचे शैक्षणिक नुकसान होणार नाही अशी खात्री दिली.  यावेळी संघटन सरचिटणीस विश्वजित पाटील, युवा मोर्चाचे अमित देसाई, प्रकाश पाटील, सिद्धांत काटकर, सिद्धार्थ विभूते, स्वप्नील मिरजे, प्रवीणकुलकर्णी, सागर पाटील आदि पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.