प्रतिष्ठा न्यूज

आबांच्या जयंतीनिमित्त तासगावला कृषीहीत प्रदर्शन 16 ऑगस्ट तें 20 ऑगस्ट दरम्यान

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगाव येथे १६ ते २० ऑगस्ट दरम्यान दत्त मंदिर मैदानावर भव्य कृषीहित प्रदर्शनाच्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन केले असल्याची माहिती प्रदर्शनाचे आयोजक युवानेते रोहित पाटिल यांनी पत्रकार परिषदेत दिली.१६ ऑगस्टला मा.ना.आर.आर. (आबा) पाटील यांची जयंती असून हे औचित्य साधून कृषीहित प्रदर्शनात कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना युवा शेतकरी पुरस्कार,महिला पुरस्कारही देण्यात येणार आहेत.कृषीहित प्रदर्शनाचा उद्देश कृषी क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाद्वारे क्रांती घडवणे असून कृषी व उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञाशी नेटवर्किंग घडवून आणणे हा आहे.या प्रदर्शनात विविध विषयावर कार्यशाळा,सेमिनार आयोजित करण्यात येणार आहे.या ठिकाणी थेट प्रात्यक्षिक (डेमो) क्षेत्रही असणार आहे.विविध कृषी उत्पादने आणि प्रयोगशील शेतकऱ्यांमुळे सांगली जिल्ह्याला देशात लौकिक प्राप्त झाला आहे.अशा या कृषिवलांना कृषी क्षेत्रातील नवनवीन घडामोडींची माहिती करून देण्यासाठी मागील वर्षांपासून कृषिहित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे.या शृंखलेतील दुसऱ्या कृषी प्रदर्शनाची तयारी सुरू झाली असून आंतरराष्ट्रीय पातळीचे कृषी उद्योग,कृषी उत्पादने व नवनवीन संशोधन करणाऱ्या संस्थांना सहभागासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे.कृषीहित प्रदर्शनाचे हे दुसरे वर्ष असून प्रदर्शनात दोनशेहून अधिक कंपन्यांचा सहभाग असतो. कृषी निविष्ठा उत्पादक,बियाणे,कृषी अवजारे, ट्रॅक्टर,ठिबक व तुषार सिंचन,फवारणी यंत्रे उत्पादक कंपन्या,बँका,विमा कंपन्या,कृषी विद्यापीठे,कृषी संशोधन केंद्रे,कृषी विज्ञान केंद्रे,विविध कृषिपूरक उद्योग, रोपवाटिका,अन्नप्रक्रिया उद्योग तसेच कृषीविषयक शासकीय विभागांचा प्रदर्शनात सहभाग असणार आहे.दोन लाखाहून अधिक शेतकरी या प्रदर्शनाला भेट देतात.कृषीहित प्रदर्शन तंत्रज्ञान प्रात्यक्षिके,प्रिसीजन फार्मिंग,कृषी विपणन धोरणे, उत्पादकता वाढ,सर्वोत्तम शेती पद्धती, क्षमता सहयोग,नफ्यात वाढ, नवकल्पनेचा ट्रेंड जाणणे इ. अपेक्षांच्या मुद्यावर आधारित असणार आहे.कृषीहित प्रदर्शनात शेतीची यंत्रे आणि उपकरणे,पीक संरक्षण आणि पोषण,अचूक कृषी तंत्रज्ञान,शाश्वत शेती पद्धती,कृषी रसायने आणि खते, बियाण्याच्या जाती आणि आनुवंशिकी,सिंचन आणि जल व्यवस्थापन प्रणाली,कृषी व्यवसाय आणि वित्त,व्हर्टिकल शेतीचे तंत्र, कृषी क्षेत्रातील ड्रोन ऍप्लिकेशन्स, मातीचे आरोग्य आणि संवर्धन,स्मार्ट सिंचन उपाय,एकात्मिक कीड व्यवस्थापन,सेंद्रिय शेती पद्धती,कृषी व्यवसाय स्टार्ट-अप धोरणे, हवामानास अनुकूल पीक वाण अशा विषयावर उत्पादन प्रात्यक्षिके, कार्यशाळा इ. उपक्रम होणार आहे.
शेतकऱ्यांसाठी कृषीहित प्रदर्शनाच्या माध्यमातून विविध विषयावर माहिती व संवाद साधण्यासाठी एक पर्वणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. कृषीहित प्रदर्शनाच्या स्टॉल बुकिंग व अधिक माहितीसाठी www.krushit.in या वेबसाईटवर किंवा ९७६५१६०८५७ (सचिन पाटील), ९६३७६२३६६१ (धोंडीराम झांबरे) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More
Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.