प्रतिष्ठा न्यूज

अटल भूजल योजनेसंबंधी एक दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर उत्साहात संपन्न

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : केंद्र शासन, जागतिक बँक व वनराई सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २२ डिसेंबर २०२२ रोजी ‘अटल भूजल योजना जलसुरक्षा आराखडा अंमलबजावणी’ या विषयावर एकदिवसीय प्रशिक्षण शिबीर, आमराई ऑफिसर्स क्लब, सांगली येथे घेण्यात आले.
यावेळी मा.दीपक शिंदे उपजिल्हाधिकारी यांनी, “ अटल योजनेत अभिसरणाद्वारे विविध विभागाची कामे करण्यासाठी सर्व विभागप्रमुखांना माहिती दिली. त्याच बरोबर पुढील पिढीसाठी पाण्याचा काटकसरणे वापर करावा, जास्त पाणी लागणाऱ्या पिकाऐवजी पर्याय म्हणून कमी पाणी लागणारी पिके घ्यावीत, जेणेकरुन पाण्याची बचत होईल. तसेच लहान शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचाव्यात याबाबत मार्गदर्शन केले. अटल भूजल योजनेंर्गत करण्यात येणाऱ्या कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. या प्रशिक्षणात अटल योजनेची माहिती, रचना, जलसुरक्षा आराखड्याची प्रक्रिया व अंमलबजावणी इ. विविध मुद्यांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
भूजलाच्या अनियंत्रीत उपशामुळे होत असलेली भूजल पातळीतील घसरण थांबविणेकरीता ‘अटल भुजल (अटल जल) योजना’ राबविण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. या योजनेअंतर्गत प्रकल्प क्षेत्रातील ९५ गावांमध्ये मागणी आधारित (पाणी बचतीच्या उपाययोजना) कामे व पुरवठा आधारित (जलसंधारण पुनर्भरण उपाययोजना) राबविण्यात येणार आहेत.
सद्यस्थितीत मनरेगा, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, जलसंधारण, इत्यादी योजनेद्वारे अभिसरण (Convergence) करण्यात येत आहे. तसेच भूजल गुणवत्ता सुधारणे किंवा अबाधित राखणे, मागणी आधारीत (पाणी बचतीचे उपाय योजना) व पुरवठा आधारीत (जलसंधारण व भुजल पुर्नभरण) व्यवस्थापनाच्या सुत्राचा अवलंब करुन भुजल साठयात शाश्वता आणणे, भूजल पातळीची घसरण थांबविणे व पाणी गुणवत्ता सुधारणा करणे इ. कृती कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.
त्याचबरोबर या योजनांच्या माध्यमातुन होत असलेल्या गुंतवणुकीमध्ये एककेंद्रभिमुखता (Convergence) साध्य करणे. जलसंपदा विभाग, कृषि विभाग, भूजल पुर्नभरण, रोजगार हमी योजना, विहिर पुर्नभरण, बंधारे शोषखडडे यांची कामे प्राधान्याने राबविणे, भुजलाच्या शाश्वत विकासाकरिता जिल्हा व ग्राम पातळीवर सक्षम संस्थात्मक व्यवस्था निर्माण करणे. सुक्ष्म सिंचन पद्धतीचा अधिकाधिक अवलंब करुन उपलब्ध पाण्याचा वापर मर्यादित करणे. सिंचन व्यवस्थापनामध्ये सुधारणा आणणे व सर्व बागायती क्षेत्रात १०० टक्के ठिंबक व तूषार सिंचनाखाली आणणे, इ. विषयाची माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी दिपक शिंदे उपजिल्हाधिकारी, सांगली, ऋषिराज गोसकी वरिष्ठ भूवैज्ञानिक, अमित जिरंगे कनिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्व्हेक्षण विकास यंत्रणा सांगली, श्री. रमेश पेठकर तज्ञ राज्य प्रकल्प व्यवस्थापन कक्ष (SPMU) आयुक्त कार्यालय पुणे, वनराई सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, श्री.प्रकाश सूर्यवंशी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वैशाली मिसाळ तांत्रिक अधिकारी भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणा सांगली, इ. उपस्थित होते. अटल भूजल योजनेत समाविष्ठ ९५ गावात सर्व शासकिय योजना राबविण्यासाठी विविध विभागातील अधिकारी यांनी आपल्या विभागाच्या योजनांची माहिती दिली. सदर प्रशिक्षण कार्यक्रमाला विविध विभागातील प्रशिक्षणार्थींचा उस्फूर्त सहभाग होता .

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More
Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.