प्रतिष्ठा न्यूज

26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्याना श्रद्धांजली वाहण्यासाठी सांगलीतून आज शहीद दौड मुंबईच्या दिशेने रवाना

सांगलीकर एकवटले- 25 नोव्हेंबररोजी धावपटू पोहचणार मुंबईत

प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली : शहीद अशोक कामटे स्मुर्ती फाउंडेशन संस्थेच्या वतीने सांगलीमध्ये शहिद दौडचे आयोजन करण्यात आले. ही दौड सांगली ते मुंबई अशी ४७० किमीची आहे. ही दौड सांगलीतील शहिद अशोक कामटे चौक ते गेट वे ऑफ इंडिया ( मुंबई ) ईथपर्यंत असणार आहे. या दौडीचा मार्ग सांगली कराड सातारा पुणे लोणावळा पनवेल मुंबई असा असणार आहे. सांगलीतून ही दौड २२/ ११ /२०२२ रोजी सकाळी ६:३० वाजता निघाली असून २६/११/२०२२ रोजी सकाळी ०८:३० वाजता पोहचणार आहे.
          या दौडला सांगलीचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उपायुक्त राहुल रोकडे, प्रसिद्ध उद्योजक गिरीश चितळे, चितळे उद्योग समूहाचे एम. डी.  कुलकर्णी तसेच बॉडिबिल्डर विश्वनाथ बकाली,ऋग्वेद कुलकर्णी व वसंतदादा पाटील कुस्ती केंद्राचे वस्ताद सुनील चंदनशिवे व सिने अभिनेता उमाकांत पाटील यांनी झेंडा दाखवून सुरवात केली.
          या दौडीमध्ये गुरुकुल इंग्लिश स्कूल, सेन्ट्रल स्कूल, देशभक्त नाथजी लाड विद्यालय, बल्लाळेश्वर क्रिकेट अकॅडमी सांगली, रॉयल फाईट क्लब मिरज, क्रॉसफिट फिटनेस अकॅडमी जयसिंगपूर, अकुज स्पोर्ट्स क्लब सांगली, ट्रॅडिशनल कराटे- डो असोसिएशन ऑफ सांगली या शाळा व संस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. तसेच तक्षिला स्कूलमधील विद्यार्थी व शिक्षकांनी शिवकालीन हत्यारे व लाठी काठी या खेळाचे प्रदर्शन करत धावणाऱ्या सांगलीकरांचे स्वागत केले.
           शहिद मॅरेथॉन चे ४७० किमी अल्ट्रा रन पूर्ण करण्यासाठी निघालेले विद्यार्थी  या दौडीचे विशेष आकर्षण ठरले. त्यामध्ये स्वप्निल माने, अमित कांबळे, प्रतीक नलवडे, वैभव आटुगडे, जयदीप घागे, आदित्य लोखंडे, विराज पाटील, सेहवाग गोसावी, सत्यजित पाटील, प्रथमेश बनसोडे, अमित सोलनकर, अक्षय पाटील, स्वप्नील कोळेकर, इरफान जायदार, चंद्रकांत निवरगी, अमित लेंगरे, विश्वनाथ सूर्यवंशी, मयूर लोंढे, ओंकार सुतार, हर्षद एटम, एकलव्य हाबळे आदींचा सहभाग आहे.
       या दौडीचे आयोजन कामी समित कदम, डॉ. चंद्रशेखर हल्लींगळे व इनायत तेरदाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश रोकडे, नजीर मुजावर,पै. शमशेर कुरणे,देवदास चव्हाण, घनश्याम उके, निलेश मिसाळ, ललित छाजेड, दीपक पाटील, अजित दुधाळ, सचिन खोंद्रे, संतोष जाधव, प्रदीप सुतार, सुधीर भगत, ओंकार जोकार, जयश्री शेलार, पवन कुंभार, पै. अभिजित पाटील, पुषण चिखली, प्रसाद दीक्षित, डॉ. सुभाष पाटील, विजय पडियार हे परिश्रम घेत आहेत.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.