प्रतिष्ठा न्यूज

खोकुर्ले येथे बिबट्या सदृश्य प्राण्याच्या हल्यात शेळी मृत

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : खोकुर्ले ता.गगनबावडा  येथे धोंडीराम विठोबा गायकवाड यांच्या शेळीच्या गोठ्यामध्ये  बिबट्या सदृश्य प्राण्याने शेळीवर हल्ला करून शेळीचे धड गायब करून शेळीचे फक्त डोके शिल्लक ठेवले .यामुळे परिसरात प्रचंड घबराट पसरली आहे.
याबाबत अधिक माहित अशी की,खोकुर्ले येथे धोंडीराम गायकवाड यांचा घराजवळ  शेळीचा कुडाचा(लाकडी) गोठा आहे.यामध्ये दोन शेळ्या व दोन बकरी होती.रात्री बिबट्या सदृश्य प्राण्याने लाकडी कुड मोडून आत प्रवेश केला.त्यानंतर आतील एका शेळीचे फक्त मुडके दोरीला अडकल्याने राहिले असून शेळीचे धड जवळपास शोध घेतला असता दिसून आले नाही.त्यामुळे शेळीचे धड या बिबट्या सदृश्य प्राण्याने खाल्ले असल्याची शक्यता आहे.याचबरोबर खोकुर्ले गावामाध्ये याअगोदर पाच-सहा कुत्रे यासारख्या प्राण्याने मारली असल्याचे नागरिक सांगतात.
घटनेची माहिती मिळताच वनरक्षक संग्राम पाटील,वनसेवक विजय सूर्यवंशी ,वन कर्मचारी आनंदा पाटील व पांडुरंग पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.या प्रकाराने शेतकरी व नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सोबत -खोकुर्ले येथे वनविभागाचे कर्मचारी पाहणी करताना.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.