प्रतिष्ठा न्यूज

गोविंदराव माणिकराव पाटील शिंदे यांचे निधन: शनिवारी अंत्यसंस्कार

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा :  लोहा तालुक्यातील जोमेगाव येथील जेष्ठ नागरिक- गोविंदराव माणिकराव पाटील शिंदे- वय (105) यांचे दि.4 ऑगस्ट 2023 रोज शुक्रवारी दुपारी 2 वाजता दुःखद निधन झाले असून त्यांच्या पार्थिव देहावर दि.5 ऑगस्ट रोज शनिवारी सकाळी 11 वाजता जोमेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
शेतीची अतिआवड, कष्टाळू, मितभाषी, व प्रेमळ स्वभाव असलेले कै. गोविंदराव पाटील शिंदे यांच्या दुःखद निधनामुळे उमरा परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांचे पश्चात- 2 सुना, 4 मुली, नातू, पणतू असा मोठा परिवार असून ते हणमंत शिंदे, मारोती शिंदे यांचे आजोबा होत.
* प्रतिष्ठा न्युज कडुन भावपूर्ण श्रद्धांजली💐💐
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.