प्रतिष्ठा न्यूज

सांगलीतील वसंत कॉलनीतील रस्त्याचे हॉटमिक्सचे काम सुरू

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि.१५ : प्रभाग क्रमांक ९ मधील वसंत कॉलनी येथील रस्त्याचे ४५ लाख रुपये खर्चाच्या हॉटमिक्स कामाचा शुभारंभ आज कागवाडचे आमदार श्री. श्रीमंततात्या पाटील, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती जयश्रीताई पाटील आणि सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते झाला.
नगरविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून पृथ्वीराज पाटील यांनी विशेष प्रयत्नातून मिळवलेल्या १० कोटी रकमेतील ४५ लाख रुपये या रस्त्यासाठी खर्च केले जाणार आहेत.
शहरातील ठीक ठिकठिकाणचे रस्ते चांगले व्हावेत, यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा निधी मंजूर करून घेण्यात आलेला आहे. त्यातूनच ही कामे केली जात आहेत, असे पृथ्वीराज पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.
या कार्यक्रमास संतोष पाटील, रोहिणी पाटील, मनगु आबा सरगर, मदिना बारुदवाले हे नगरसेवक तसेच आनंदराव शिंदे, दिलीपराव शिंदे, दिलीप शेटे, विजयराव नवले, नानवाणी, ॲड. शिवाजीराव पाटील, अविनाश शिंदे, सागर बिरजे, सुभाष पाटील, चंद्रकांत पाटील, रोहित पाटील, प्रशांत पाटील, श्रीमती जयमाला खराडे, जयश्री शिंदे, शैलजा पाटील, भाग्यश्री शिंदे आणि इतर नागरिक उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.