प्रतिष्ठा न्यूज

सांगशी येथे आढळला कॅलीओफीस कॅस्टो जातीचा सर्प : शिवाजी विद्यापीठातील अभ्यासकांचे संशोधन

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा, ता. 3 : कोल्हापूर जिल्ह्यातील सांगशी तालुका गगनबावडा येथील शिवाजी विद्यापीठाचा प्राणी शास्त्राचा विद्यार्थी सचिन संजय कांबळे याला हा सर्प 28 जून 2020 रोजी जमिनीत आढळून आला. घराशेजारील शेतात खड्डा खोदताना दोन फूट खाली, मोकळ्या मातीत हा साप आढळून आला. हा कॅलीओफीस कॅस्टो या अत्यंत दुर्मीळ सापांची नोंद कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तून करण्यात आली आहे.
सचिन कांबळे हा शिवाजी विद्यापीठाचा निसर्ग अभ्यासक विद्यार्थी आहे. या नव्या संशोधनामुळे या जिल्ह्यातील सापाच्या अधिवासात भर पडली आहे. सरीसृप तज्ञ डॉक्टर वरद गिरी यांनी या सापाची ओळख पटवली. या संशोधनामुळे गगनबावडा ची समृद्ध जैवविविधता ठळक झाली आहे.
बंगलोर मधील वन्यजीव अभ्यासक प्रवीण एच एन आणि शिवाजी विद्यापीठाचा प्राणी शास्त्राचा विद्यार्थी सचिन कांबळे यांनी ही नोंद केली.


सचिन हा सांगशी येथील माजी सभापती मंगल कांबळे व सांगशी माध्यमिक विद्यालय चे कर्मचारी संजय कांबळे यांचे सुपुत्र आहेत.

एक रंग नसलेला सडपातळ डोक्यावर शरीरावर नारिंगी पट्टी आणि शेपटीच्या खालच्या बाजूने एक समान केशरी रंगाच्या आधारे याला कॅलीओफीस कॅस्टो म्हणून ओळखले गेले. याची लांबी 80 सेंटीमीटर होती.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.