प्रतिष्ठा न्यूज

काटकर, भोसलेनी समजावले शिवाजी पुतळ्या जवळील संतप्त जमावाला

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगलीच्या शिवाजी महाराज पुतळ्याजवळ शुक्रवारी दुपारी रामकृष्ण नगर आणि कुपवाड परिसरातील कार्यकर्ते वादग्रस्त पोस्टर लावण्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी जमले होते. या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ही ठेवण्यात आला होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर आणि काँग्रेसचे नगरसेवक अभिजीत भोसले यांनी घटनेचा निषेध करून याप्रकरणी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट घेतली जाईल असे सांगून पोलीस अधिकाऱ्यांना याबाबतचे वास्तव कार्यकर्त्यांपुढे जाहीर करण्याची मागणी केली. पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित प्रकरणातील आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला 14 दिवसाची कोठडी सुनावली आहे अशी माहिती दिली. दरम्यान या पोस्टशी संबंधित असणाऱ्या आणखी काही लोकांची नावे आंदोलक कार्यकर्त्यांनी सांगितली असून ती सर्व नावे पुराव्यासह पोलिसांच्याकडे दिली असल्याची माहिती काटकर आणि भोसले यांनी जमावाला दिली. उपस्थित कार्यकर्त्यांनीही सामंजस्याने घेऊन सांगलीचे वातावरण बिघडवणाऱ्यांना जेलमध्ये टाकण्याची मागणी केली. संतप्त झालेल्या जमावाने पोलिसांनी केलेल्या अटकेच्या कारवाईचे स्वागत करून या प्रकरणातील कोणालाही सोडले जाणार नाही अशी पोलिस अधिकाऱ्यांकडून शब्द देण्याची मागणी केली. त्यानुसार पोलीस अधिकाऱ्यांनीही या प्रकरणात दोष असेल त्या प्रत्येकावर कारवाई होईल असे आश्वासन दिल्यानंतर जमावाने शांततेने शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरातून आपापल्या भागात जाणे पसंत केले. दरम्यान रात्री उशिरापर्यंत सांगली शहरातील सर्व भागात पोलिसांची वाहने आणि दुचाकी वरील पोलीस कर्मचाऱ्यांची टीम परिस्थितीचा आढावा घेऊन पोलीस प्रमुखांना त्याचा अहवाल कळवत होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.