प्रतिष्ठा न्यूज

तासगाव येथे उद्या निषेध मोर्चा

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : म.फुले,कर्मवीर भाऊराव पाटील,विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवा बद्दल राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बेताल चुकीचे वक्तव्ये करून सर्व महामानवांचा अपमान केला आहे,त्यांचा निषेध करण्यासाठी शहरातील एसटी स्टँड चौक डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा,सांगली नाका डॉ. आंबेडकर सर्कल ते तहसीलदार कार्यालय पर्यंत आंबेडकर चळवळीतील सर्व संघटना,आंबेडकर प्रेमी सर्व कार्यकर्ते,पुरोगामी विचाराचे नेते व कार्यकर्ते सर्व विरोधी पक्षाचे कार्यकर्ते यांचे वतीने निषेध मोर्चा दि.१३ मंगळवार दुपारी बारा वाजता आयोजित केला आहे.महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आलेले आहे तेव्हापासून राज्यपाल सहित त्यांच्या खात्यातील काही आमदार काही मंत्री हे महापुरुषांच्या बद्दल चुकीची विधान करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे महा पाप करीत आहेत,त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मंत्री यांच्या तोंडावर काळी शाई फेकून पिंपरी चिंचवड येथे निषेध व्यक्त करण्यात आला होता, त्या कार्यकर्त्यावर कायद्याचा गैरवापर करीत अनेक गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ते तातडीने गुन्हे मागे घ्यावेत तसेच संबंधित अकरा पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर निलंबन करण्यात आले आहेत तेही मागे घेण्यात यावे व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व पाटील यांची मंत्रिमंडळातून तातडीने हकलपट्टी करावी या मागणीसाठी निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.त्या संदर्भात तासगाव पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे साहेब यांना निवेदन देण्यात आले.यावेळी माजी नगरसेवक सी.पी. कांबळे,प्रमोद अमृतसागर,भीमराव भंडारे,पत्रकार राहुल कांबळे, दलित मित्र मिलिंद माने,मुन्ना कोकणे, संभाजी माळी,महाकु मोरे,प्रकाश कांबळे,निलेश गवाळे,पोपट कांबळे,संजय देवकुळे इ.कार्यकर्ते उपस्थित होते.तरी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बेताल व बेजबाबदार वक्तव्याचा निषेध करण्यासाठी तासगाव शहरासह तालुक्यातील सर्व विरोधी पक्ष चे कार्यकर्ते पुरोगामी  विचाराचे नेते व कार्यकर्ते तसेच आंबेडकर प्रेमी कार्यकर्त्यांनी सदरच्या मोर्चामध्ये सामील व्हावे असे आवाहन चळवळीतील नेते प्रमोद अमृतसागर, माजी नगरसेवक सी.पी.कांबळे,मिलिंद माने,पत्रकार राहुल कांबळे,माजी नगरसेवक महाकु मोरे,उत्तम कांबळे,प्रमोद कांबळे, मिलिंद कांबळे,यांनी केले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.