प्रतिष्ठा न्यूज

सांगलीत शनिवारी विराट हिंदू गर्जना मोर्चा

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
सांगली : आपल्या माता-भगिनींसाठी, गोमातेसाठी,धर्माच्या रक्षणासाठी लव्ह जिहाद विरोधी कायदा राज्यासह संपूर्ण देशात लागू करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी *विराट हिंदू गर्जना* मोर्चा शनिवार दिनांक 24/12/2022 रोजी सकाळी 10 वाजता सकल हिंदू समाज सांगली जिल्हा यांच्यावतीने आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती माजी आमदार नितीन शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी भाजपचे नेते मकरंद देशपांडे, युवा नेते पृथ्वीराज पवार, नगरसेविका स्वाती शिंदे उपस्थित होते.

समस्त हिंदू बंधू  भगिनी व मातांनो हिंदुस्तानची सद्य परिस्थिती पाहता हिंदू समाजास जिहादी अजगर गिळंकृत करू पाहतो आहे.जिहादी आतंकवाद,लँड जिहाद, व्यावसायिक जिहाद यासोबतच एक महाभयानक विकृती *लव्ह जिहाद* आपले हिंदु तरुण मुली,माता भगिनी यांना लक्ष करीत खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यासाठी षडयंत्र रचले जात आहे.काही जहाल विचारांच्या लोकांकडून जिहादी विचारांच्या मुलांना यासाठी आर्थिक व कायदेशीर मदत पुरवली जाते.खोट्या प्रेमात अडकवून हिंदू मुलींशी लग्न केल्यानंतर या तरुणांना मोठ्या रकमेचे बक्षीस दिली जातात.या षडयंत्रात फसलेल्या हिंदू मुली व स्त्रियांना पुसटशीही कल्पना नसते की आपण फसवले जात आहोत.पुढे असंख्य तरुणींना हे जिहादि माथे फिरू मुलांकडून मारहाण केली जाते. त्यांच्यावर शारीरिक व मानसिक अत्याचार केले जातात.व काही मुलींना पुढे विकण्यातहि आले आहे, अशी उदाहरणे राजरोसपणे घडलेली आहेत.या विरोधात सकल हिंदू समाजाकडून मोर्चाद्वारे गर्जना करण्यात येते की या देशात पुन्हा कोणत्याही हिंदू मुलीची हत्या किंवा लव जिहाद व गो हत्या होता कामा नये त्यासाठी विशेष कड़क कायदे बनवले जावेत,यासाठी हा मोर्चा आपल्या तरुण मुली व माता-भगिनी यांच्या नेतृत्वात काढण्यात येणार आहे.यासाठी प्रत्येक हिंदूंनी सहकुटुंब या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन सकल हिंदू समाज सांगली जिल्हा यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
मोर्चासाठी एकत्र येण्याचे ठिकाण:
राम मंदिर चौक सांगली मिरज रोड सांगली
वेळ: सकाळी दहा वाजता

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.