प्रतिष्ठा न्यूज

डॉ.डी वाय पाटील साखर कारखान्याने घेतले १३ क्षयरुग्ण दत्तक

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा ता.२२ : पंतप्रधान टी.बी. मुक्त भारत निक्षय मित्र योजनेअंतर्गत डॉ.डी वाय पाटील सहकारी साखर कारखान्यांने गगनबावडा परिसरातील १३ क्षयरुग्णांना दत्तक घेतले आहे. या रुग्णांना पोषण आहार किट वाटप कार्यक्रम तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय गगनबावडा येथे पार पडला. याबाबत डॉ. उषा जी कुंभार जिल्हा क्षयरोग अधिकारी यांनी आवाहन केले होते. यास प्रतिसाद देऊन किट वाटप करण्यात आले. हे कीट पुढील सहा महिने दरमहा देण्यात येणार आहे.
यासाठी डॉ. डी वाय पाटील साखर कारखान्याचे चेअरमन आमदार सतेज उर्फ बंटी  पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या कार्यक्रमा वेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक जयदीप पाटील,सेक्रेटरी नंदकुमार पाटील,शहाजी सुतार, गटविकास अधिकारी माधुरी परीट, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विशाल चोकाककर, डॉ. अजयकुमार गवळी, विस्तार अधिकारी विजय सावंत,अर्जुन इंगळे,अंकुश तेलंगे,पुजारी, आनंद काळे, उत्तम पाटील, किरण खाडे, दीपक कांबळे, क्षयरोग पर्यवेक्षक नानासो पाटील, रणजीत संकपाळ, संजय पाटील,एकनाथ पाटील, नियाज शेख तसेच  आरोग्य विभाग, पंचायत समिती गगनबावडा कडील सर्व कर्मचारी, गटप्रवर्तक, आशा स्वयंसेवक व सर्व स्टाफ उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.