प्रतिष्ठा न्यूज

गरीब कुटुंबातील लक्ष्मीकांत कहाळेकर यांना एमबीबीएसच्या शिक्षणासाठी मदत करा- नगराध्यक्ष- गजानन सुर्यवंशी यांचे आवाहन

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
उमरा प्रतिनिधी : जुना लोहा येथील अत्यंत गरीब कुटुंबातील लक्ष्मीकांत कहाळेकर हा विद्यार्थी मेहनत, व कठोर परिश्रमाच्या जोरावर रात्र-दिवस अभ्यास करून वैद्यकीय शिक्षण एमबीबीएस साठी पात्र ठरून जळगाव येथील शासकीय कॉलेजला प्रवेश मिळाला परंतु घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असुन वडीलाचे क्षेत्र हरवले आहे, आई शिवणकाम करून घर चालविते लक्ष्मीकांत कहाळेकर हा एमबीबीएस साठी पात्र ठरल्यामुळे त्याला पुढील शिक्षणासाठी आर्थिक चणचण भासत असल्यामुळे त्याला लोहा नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी 50 हजार रुपयांची मदत केली.
यावेळी लोहा नगरपालिकेच्या वतीने लक्ष्मीकांत कहाळेकर यांचा शाल, श्रीफळ, देऊन त्याचा व त्यांच्या आईचा सत्कार केला व पुढिल शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी नगरसेवक जिवन पाटील चव्हाण, नबी शेख, कंधार नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष मन्नानभाई शेठ, बुलढाणा बॅकेचे शाखाधिकारी केशवराव शेटे, राजुभाऊ शेटे, दताभाऊ शेटे, माधव वसमतकर, काशीनाथ शेटे, माधव फाजगे, पत्रकार केशव पाटील पवार, केलास काहाळेकर, आदी उपस्थित होते
लक्ष्मीकांत कहाळेकर यांचा एमबीबीएसच्या शिक्षणासाठी पात्र ठरला पंरतु त्यांना शिक्षणासाठी आर्थिक चणचण भासत होती पैशाअभावी त्यांचे शिक्षण थांबू नये म्हणून अनेक दानशूर व्यक्ती हे आर्थिक मदत करीत आहेत त्यांचाच एक भाग म्हणून लोहा नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगरअध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी लक्षीमीकांत काहाळेकर यांना 50 हजार रुपयांची मदत देण्यात आली तसेच समाजातील दानशूर व्यक्तींनी व अनेक श्रीमंत असलेले व्यापारी, सरकारी नौकरदार, लोकप्रतीनिधी यांनी सामाजिक बांधिलकी जोपासुन भावी डॉक्टर होणाऱ्या लक्ष्मीकांत कहाळेकर यांना जमेल तशी आर्थिक मदत करावी असे आवाहन नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.