प्रतिष्ठा न्यूज

आघाडीचा पार्श्वगायक जावेद अली शास्त्रीय गायक पंडित जयतीर्थ मेहुंडी अशा दिग्गजांच्या संगीत अविष्काराने नटलेला स्वर तृप्तीचा आनंद देणारा ‘सुरश्री संगीत महोत्सव 2023’ रंगणार – सुरेश पाटील, श्रीपाद चितळे

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : शास्त्रीय गायन, वादन, नृत्य क्षेत्रातील कलाकारांबरोबरच हिंदी चित्रपट गीतामधील आघाडीचा पार्श्वगायक जावेद अली यांचा नव्या पिढीच्या संगीताची रसास्वादाची महापर्वणी सांगलीत ‘सुरश्री संगीत महोत्सवच्या रूपाने रसिकांना 15 ते 17 जानेवारी दरम्यान मिळणार आहे. सिनेक्षेत्रामध्ये शास्त्रीय संगीत आल्यामुळे शास्त्रीय अभिजात कलांकडे रसिकजनांचा ओढ वाढत आहे. त्यामुळे या क्षेत्रातील सर्वोत्तम कलाकार सांगलीत आणण्याच्या उद्देशाने माजी महापौर सुरेश पाटील, यांचे मिलेनिअम फाउंडेशन व चितळे उद्योग समूहाच्या श्रीपाद चितळे यांनी ‘सुरश्री संगीत महोत्सव 2023’ चे आयोजन केले आहे. रविवार दिनांक 15 ते मंगळवार दिनांक 17 जानेवारी 2023 या तीन दिवसामध्ये सायंकाळी ५ वाजल्यापासून देशपातळीवरील नामवंत कलाकरांचा वैविध्यपूर्ण स्वरकलाविष्कार या महोत्सवात रसिकांना अनुभवता येणार आहे. चितळे उद्योग समूह, भिलवडी व मिलेनियम फाऊंडेशन, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील तरुण भारत स्टेडियम मारुती चौक शिवाजी मंडई सांगली येथे हा महोत्सव रंगणार आहे. अशी माहिती संयोजक माजी महापौर सुरेश पाटील व चितळे उद्योग समुहाचे श्रीपाद चितळे यांनी दिली.
‘सुरश्री संगीत महोत्सव 2023’ मध्ये आपल्या आवडत्या कलाकरांचे गायन, वादन, नृत्य आपल्याला अनुभवता येणार आहे. असेही श्री श्रीपाद चितळे आणि सुरेश पाटील यांनी सांगितले.
रविवार दिनांक 15 जानेवारी 2023 या दिवशी वसंत वलय निर्मित शब्दसुरांचे लेणे भावगीत चित्रपट गीत नाट्यगीत लावणी, अभंग, कविता, चारोळ्या, विनोद आणि दिलखुलास गप्पांची मैफिल रंगणार आहे. यातील कलाकार गौतमी देशपांडे झी मराठी माझा होशील ना फेम, योगेश सोनी स्टार प्रवाह मुलगी झाली हो फेम, शमिका भिडे आयडिया सारेगमप, मयूर सुकाळे आयडिया सारेगमप, कल्याणी जोशी, धनंजय मस्कर, विनय जेऊरकर आणि त्याचबरोबर सुप्रसिद्ध निवेदक आणि संयोजक विघ्नेश जोशी यांचा कार्यक्रम होणार आहे दुसऱ्या दिवशी 16 जानेवारी 2023 रोजी शास्त्रीय व उपशास्त्रीय गायक श्री जयतीर्थ मेवुंडी यांचे शास्त्रीय उपशास्त्रीय गायन होणार आहे. याचबरोबर शितल कोलवालकर आणि कलाकार यांचे कथक नृत्य पाहायला मिळणार आहे. यामध्ये मिलिंद कुलकर्णी हार्मोनियम प्रसाद पाध्ये तबला ओमकार दळवी मृदुंग अपूर्व द्रविड तालवद्य असे कलाकार असणार आहेत तिसऱ्या दिवशी दिनांक 17 जानेवारी 2023 ला प्रसिद्ध हिंदी पार्श्वगायक श्री जावेद अली नुकत्याच सुपरहिट झालेल्या पुष्पा या फिल्ममधील श्रीवल्ली फ्रेम यांचा हिंदी व सुफी चित्रपट गीतांचा कार्यक्रम सांगलीतील रसिकांसाठी संगीतमय मेजवानी असणार आहे.
बरेच वर्ष खंडित असलेली संगीत महोत्सवाची परंपरा या सुरश्री संगीत महोत्सवाने जोमाने सुरू होत आहे. ज्या आतुरतेने पुणेकर रसिक ‘सवाई गंधर्व महोत्सवाची वाट पाहात असतात, त्याच आतुरतेने सांगलीत साकार होत असलेल्या ‘सुरश्री संगीत महोत्सवची सांगलीकर संगीत रसिकप्रेमी वाट पाहतील. सांगलीतील संगीत रसिक प्रेमीच्या दृष्टीने पर्वणी ठरणा-या या ‘सुरश्री संगीत महोत्सव 2023’ ने सांगली नगरीच्या शिरपेचात एक वेगळाच तुरा खोवला जाईल असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
या संगीत महोत्सवाच्या देणगी प्रवेशिका सांगली व मिरजेमधील विविध ठिकाणी उपलब्ध करण्यात येत आहेत. तसेच जगभरातील देणगीदार रसिकांसाठी हा कार्यक्रम ऑनलाईन पाहता येणार आहे. देणगी प्रवेशिका मिळवण्यासाठी www.book my show.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.
या कार्यक्रमाचे मिलेनिअम होंडा, चितळे उद्योग समूह, पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, उगार शुगर वर्क्स, हरमन चहावाला, बँक ऑफ इंडिया, उष:काल अभिनव इन्स्टिट्यूट, कोठारी ग्रुप, न्यूलॉजिक, डी वाय पी. ग्रुप, समृध्दी ग्रुप हे मुख्य प्रायोजक आहेत. या कार्यक्रमासाठी श्री बाळासाहेब मिरजकर यांचेही सहकार्य लाभले आहे. तसेच याचे संयोजन महेश कराडकर, उमेश देसाई बाळासाहेब कुलकर्णी, विशाल कुलकर्णी, शैलेश स्वामी, संयोजन समिती करत आहेत यांची देणगी प्रवेशिका मिळण्याची ठिकाणे, मिलेनिअम होंडा, पुष्पराज चौक, सांगली,चितळे एक्स्प्रेस, गुलमोहोर कॉलीनी, सांगली,हरमन चहा, राम मंदिर, सांगली | हरभट रोड, सांगली | विजयनगर, सांगली | मिरज मार्केट, हॉटेल हनुमान एक्झिक्युटिव्ह, विश्रामबाग, सांगली, बिबा शोरूम, एस एफ सी मॉल, सांगली,सांगली ट्रेडर्स को-ऑप क्रेडीट सोसायटी, राजमती भवनसमोर, नेमीनाथ नगर, सांगली | मार्केट यार्ड, सांगली,सुमधुर एजन्सी, ब्राम्हणपुरी | दत्त चौक, मिरज, एपी बेकरी मिरज आणि सांगली, दांडेकर आणि कंपनी भरगच्च सांगीतिक मेजवानीचा आस्वाद घेऊन दाद द्यावी असे आवाहन सुरश्री संगीत महोत्सवाचे संयोजक समन्वयक माजी महापौर सुरेश पाटील व चितळे उद्योग समुहाचे श्रीपाद चितळे यांनी केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.