प्रतिष्ठा न्यूज

ग्राहक पंचायत महाराष्ट्र गगनबावडा तालुका शाखा स्थापनेसाठी शुक्रवारी महत्त्वाची सभा

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा ता.३० : ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संस्थेची गगनबावडा तालुका शाखा स्थापनेसाठी शुक्रवार दिनांक २ डिसेंबर,२०२२ रोजी दुपारी ठिक २.०० वा. गगनबावडा येथे सभा आयोजित केली आहे.
भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे संस्थापक ग्राहकतीर्थ स्व.बिंदुमाधव जोशी स्थापित ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या माध्यमातून राज्यातील २२ जिल्ह्यात ग्राहक जागृतीचे कार्य करत आहे. ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे कार्य तालुका व गाव पातळीवर पोहो चविण्यासाठी ‘ तालुका तेथे संस्थेची शाखा’ स्थापनेसाठी प्रयत्न सुरू आहेत.
सर्वसामान्य ग्राहक हा केंद्रबिंदू मानून काम करणा-या ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची रचना, तत्वज्ञान व कार्यपद्धतीची ओळख तालुक्यातील सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना करून देण्यासाठी तालुक्यात यापूर्वी दोन विचारविनिमय सभा संपन्न झाल्या. व त्याला प्रतिसादही चांगला मिळाला.

 जिल्हाध्यक्ष बी जे पाटील येणार
गगनबावडा तालुक्यातील दुर्गम,विखुरलेल्या वाड्या वस्त्यांवरील ४६ गावांमध्ये  ग्राहक  चळवळ पोहचविणेचे आव्हान स्वीकारले असून  त्यासाठी तालुका शाखा स्थापन करण्यासंदर्भात  अत्यंत महत्त्वाची सभा शुक्रवार दिनांक २ डिसेंबर रोजी गगनबावडा येथे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बी.जे.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली आहे.

राज्य सदस्य प्रा. एस एन पाटील यांची उपस्थिती
या सभेला गगनबावडा तालुक्याचे सुपुत्र  संस्थेचे राज्य सदस्य व सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा.एस.एन.पाटील, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर भदरगे, जिल्हा संघटक सुरेश माने व पन्हाळा तालुका अध्यक्ष बाजीराव कदम उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

शिक्षक, डॉक्टर, वकील व पत्रकार यांना उपस्थित राहण्याचे आवाहन
गगनबावडा तालुक्यातील  सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते व ग्राहक चळवळीत काम करु‌ इच्छिणाऱ्या व्यक्ती, शिक्षक, डॉक्टर, वकील व पत्रकार यांनी सभेला उपस्थित रहावे असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोल्हापूर जिल्हा शाखेने केले आहे.अधिक माहितीसाठी भास्कर माने (9321991507) व गुरुनाथ कांबळे (9689861650) यांच्याशी संपर्क साधावा असे संस्थेने कळविले आहे.

“ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा कणा असून, आज ग्राहकाची अनेक प्रकारे फसवणूक, अडवणूक होत आहे. ग्राहकांचे संघटन, ग्राहकांचे प्रबोधन आणि ग्राहकाना योग्य मार्गदर्शन करण्याचे कार्य ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे. ग्राहकाच्या हक्क आणि अधिकारासाठी कार्य करणारे ग्राहक पंचायत महाराष्ट्र एक अग्रगण्य संस्था आहे.”
प्रा. एस एन पाटील,
राज्य सदस्य ग्राहक पंचायत महाराष्ट्र

  ” गगनबावडा तालुका हा छोटा तालुका असून ग्राहकानी संघटित होणे अत्यंत जरुरीचे आहे. विशेषतः स्त्रियांनी यात भाग घेऊन होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहिले पाहिजे. ‘ गिर्‍हाईक’ न बनता सजग ग्राहक बनले पाहिजे.”
मेघा राणी जाधव
माजी जि प सदस्या

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.