प्रतिष्ठा न्यूज

परब्रह्म परमचैतन्य साक्षात श्री पांडुरंगाच्या गाभाऱ्यात “तू माझा सांगाती” चे प्रकाशन होणं हा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण : डॉ प्रतिभा पैलवान

प्रतिष्ठा न्यूज
पंढरपूर प्रतिनिधी : इचलकरंजी येथील श्रीमती अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या डॉ प्रतिभा पैलवान यांच्या “तू माझा सांगाती” या ललित संग्रहाचे प्रकाशन श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. श्री क्षेत्र आळंदी ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी वारी सोहळ्यामध्ये आलेल्या अनुभवाचे कथन या संग्रहामध्ये करण्यात आलेले आहे. आणि हा अविस्मरणीय प्रकाशन सोहळा साक्षात परब्रम्ह परम चैतन्य श्री पांडुरंगाच्या चरणाजवळ झाला हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे. काळजात शेवटच्या श्वासापर्यंत जपून ठेवाव्यात अश्या आठवणीने आज आयुष्य समृद्ध झालं, असे मत डॉ पैलवान यांनी यावेळी व्यक्त केले.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अखंड चोवीस तास विणा घेऊन उभे असणारे श्री बडे बंधु यांच्या हस्ते या संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. आणि मंदिरात संग्रहाचे प्रकाशन होणे हा महाराष्ट्रातील, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील क्वचित घडून येणारा प्रसंग अनुभवास मिळाला, त्याबद्दल डॉ पैलवान यांना अनेकांनी भरभरून शुभेच्छा दिल्या, श्री विठ्ठलाच्या चरणांशी असा सोहळा संपन्न होणे ही पूर्व जन्माची पुण्याई आहे, डॉ पैलवान करत असलेल्या सामाजिक साहित्यिक आणि शैक्षणिक कार्यासाठी श्री विठ्ठलाचे आशिर्वाद आहेत,असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते प्रणव परिचारक,ह भ प श्री ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, ह भ प श्री मदन महाराज हरिदासी, माननीय श्रीमती शकुंतला नडगिरे ताई,पंढरपूर मधील प्रसिद्ध अयोध्या ज्वेलर्सचे सर्वेसर्वा माननीय शहाजी मोहिते वेलनेस कोच सौ.महानंदा कदम तसेच पुणे जिल्हा सरपंच महासंघाचे अध्यक्ष विकास कडू पाटील पुणे जिल्हा सरपंच संघाचे उपाध्यक्ष श्री सागर चोरघे, ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती सुनंदा पाटील, नोबल ज्वेलर्स, तासगाव चे श्री किरण पाटील, डिजिटल मीडिया,सांगलीचे श्री तानाजीराजे जाधव,सौ विद्या जाधव, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर नित्योपचार प्रमुख श्री अरुण सरगर उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.