प्रतिष्ठा न्यूज

“नांदेड कृषी महोत्सव 2023” मध्ये- अन्नदाता शेतकरी स्वयंसहाय्यता बचतगट व सुप्रियाताई सुळे महिला बचतगट- धामणगाव यांचा यशस्वी सहभाग

प्रतिष्ठा न्युज /वसंत सिरसाट
नांदेड : दरवर्षी प्रमाणे यंदाही नांदेड येथे जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन दि.1ते 5 मार्च 2023 रोजी करण्यात आले होते. यात मुखेड तालुक्यातील धामणगाव येथील अन्नदाता शेतकरी स्वयंसहाय्यता बचतगट व सुप्रियाताई सुळे महिला बचतगट यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती नवा मोंढा मैदान नांदेड येथील कृषि महोत्सवातील 160 एबी स्टॉल मध्ये दैनंदिन उपयोगात येणारे ज्वारी, मुग, तुर, गव्हू, काकडी, टरबूज, खरबूज, केशर आंबा, हे धान्य व फळफळावर आपल्या स्टॉल मध्ये विक्री साठी ठेवले असता यांची मोठया प्रमाणावर विक्री करण्यात आली असल्याची माहिती रयत क्रांती पक्षाचे जिल्हाध्यक्ष-उत्तमराव पाटील वडजे धामणगावकर यांनी दिली असून या विक्री स्टॉलला नांदेड दक्षिणचे आमदार मोहनअण्णा हंबर्डे,संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष- संकेत पाटील, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष- सुभाष पाटील कोल्हे, महानगराध्यक्ष-सतिश धुमाळ, अशोक कदम, बालाजी देशमुख, बंडू पाटील खतगावकर, लक्ष्मण अनकाडे, बळवंत टेकाळे, मधुकर खतगावकर, इटकावडे सर, मारोती चांडोळकर, प्रभु बर्गे, रुक्मिणीबाई बर्गे, विलास बर्गे,सुरेखा टेकाळे, तसेचनवी दिशा फॉर्मर कंपनीचे- अनिल मुनगीलवार, एरीया सेल्स मॅनेजर आदास्का इंडियाचे- सिध्देश्वर खोडे, सेल्स ऑफीस नांदेडचे- शिवाजी सितोळे, विशाल बी॒राडे, व शेतकरी, पुरुष, महिला, व सर्वच क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी भेटी दिल्या यावर सर्वांनी समाधान व्यक्त केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.