प्रतिष्ठा न्यूज

कवठे एकंद येथे जागृत हिंदू बांधवाकडून मूक मोर्चा

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : बांग्लादेश येथे हिंदू नागरिकांवर अन्याय अत्याचार करण्यात आला,काही समाज कंटकांनी हिंदू नागरिकांवर तसेच हिंदूच्या धार्मिक स्थळांना लक्ष केले या घटनेच्या निषेधार्थ कवठे एकंद येथे सकल हिंदू बांधवाच्या वतीने मूक रॅली काढण्यात आली,व बळी पडलेल्या हिंदू नागरिकांसाठी श्रद्धांजली वाहण्यात आली.सायंकाळी सिद्धराज देवालय येथून एसटी स्टँड चौक ते जुनी चावडी अशी निषेध रॅली काढण्यात आली.यामध्ये समस्त जागृत हिंदू बांधव युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी  बोलताना कार्यकर्त्यांनी बांगला देशातील हिंदू वरील अत्याचाराचा निषेध व्यक्त केला.यावेळी ऍडव्होकेट अतूल डांगे,दीपक घोरपडे,सौरभ पावशे,सुनील बाबर,हरीश जोशी,गणेश कुलकर्णी, नितेश तपासे,श्रवण पाटील,अनिकेत गुरव,कपिल शिरोटे,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.