प्रतिष्ठा न्यूज

कोल्हापूर गगनबावडा राष्ट्रीय महामार्ग बनला ‘डेंजर झोन’ रस्त्याची अक्षरशः चाळण

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा : कोकणाशी जोडणारा प्रमुख मार्ग म्हणून कोल्हापूर गगनबावडा महामार्ग ची ओळख. मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रातून सिंधुदुर्ग गोव्याकडे येणारे प्रवासी हे सर्रास याच मार्गावरून प्रवास करतात. आता कोकणातील प्रमुख सण गणेश वीस दिवसांवर  येऊन ठेपली आहे. करूळ घाट दुरुस्तीच्या कारणास्तव गेले सहा महिने बंद आहे. त्यामुळे चाकरमान्यांची वर्दळ भुईबावडा घाटातूनच चालू आहे.
मुंबईच्या चाकरमान्यांची  कोल्हापूर मार्गे गावाकडे जाण्यासाठी वर्दळ वाढली आहे. पण या मार्गावरील खड्ड्यांचे साम्राज्य पाहिले तर, मार्ग खडतर बनला आहे. लोंघे,तिसंगी, साळवन, मांडुकली, शेनवडे,खोकुर्ले,असळज, सांगशी, जांभूळणेवाडी दरम्यानच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यावरून चालणे ही मुश्किल झालेले आहे. याला कारण महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष आहे.
या मार्गावरून  अवजड वाहनांची वर्दळ वाढलेली आहे. पण ही वाहने नियमापेक्षा दुप्पट, तिप्पटीने वाहतूक करतात. वाहतुकीच्या मर्यादेचे उल्लंघन करतात. इकडे कोणाचेही  लक्ष नाही. यामुळे रस्ते खराबी बरोबरच वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होतात. यासाठी काही महत्त्वाच्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवून नियंत्रण ठेवणे जरुरीचे आहे.
दुसरे अत्यंत महत्त्वाचे कारण असे रस्ते करताना ठेकेदाराने वापरलेल्या साहित्याची निरीक्षण शासकीय अधिकाऱ्यांनी करायला हवे
पण प्रत्यक्षात ठेकेदार च प्रयोग शाळेत दर्जेदार मटेरियल चे नमुने देतो. आणि प्रत्यक्षात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरतो. त्यामुळे पहिल्याच पावसात खड्ड्यांचे साम्राज्य पसरते. यावरही शासकीय अधिकाऱ्यांचे नियंत्रण नाही. असेच म्हणावे लागेल.

* रस्त्याला पानंदी चे स्वरूप, रस्त्यात भला मोठा खड्डा, अपघाताला निमंत्रण  *
शेनवडे जवळ रस्त्यात  मध्यभागी दोन भले मोठे खड्डे पडलेले आहेत .ते खड्डे इतके खोल आहेत की तातडीने भरून न काढल्यास  रात्रीचे वेळी हमखास अपघात होण्याची शक्यता आहे.
*हे सगळे कागदावरच*
शासनाने रस्ते आणि त्याची गुणवत्ता राखण्याबाबत शंभरवर सूचना केल्या आहेत. त्यात रस्त्यांची बांधणी करताना योग्य स्वरूपाचे मिश्रण करणे आदि शंभरभर सूचना केल्या आहेत. आता तर कायद्यामध्ये २०१९मध्ये केलेल्या दुरुस्तीने रस्ते सुरक्षा आणि त्याबाबतचे दायित्व निश्चित केले आहे. खड्ड्यामुळे अपघात झाला तर संबंधित ठेकेदार अधिकारी सल्लागार यांच्याकडून एक लाखापर्यंत वसुली करता येईल अशी तरतूद आहे तथापि हे सगळे कागदावरच आहे. प्रसंगी कारवाईचा बडगादेखील उभारला पाहिजे त्याशिवाय रस्ते खड्डे मुक्त होणारच नाहीत.

“माझा टेम्पो गोकुळ दूध संघाकडे भाडेतत्त्वावर आहे.मी गगनबावड्या पासून तिसंगी पर्यंत अठरा दूध संस्थांचे दूध संकलन करून  दिवसातून दोन वेळा जावे लागते. या मार्गावर मोठे मोठे खड्डे असल्याने गाडी दुरुस्तीची कामे वारंवार निघतात. त्यामुळे उत्पन्न व खर्चाचा मेळ बसत नाही. बँके कडून काढलेले कर्ज कसे फेडावे याची विवंचना पडते.”

सुहास यादव, सांगशी, वाहनधारक

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.