प्रतिष्ठा न्यूज

राजीव कोरे ब्राईट फ्युचर पब्लिक स्कूलमध्ये पारंपरिक पद्धतीने नागपंचमी साजरी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : यंगमेन्स मॉडेल एज्युकेशन सोसायटीच्या राजीव कोरे ब्राईट फ्युचर पब्लिक स्कूल मध्ये नागपंचमिचे औचित्य साधून हा सण अतिशय पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला.
यावेळी वारूळ व नागाची प्रतिकृती करण्यात आली होती. प्रमुख पाहुणे सौ सुप्रिया कडणे व सौ ज्योती महंत शेट्टी यांनी नागपंचमीची पूजा केली शाळेच्या प्रा. एम व्ही जयलीला मॅडम.यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. सौ पूनम रेणके यांनी नागपंचमीची माहिती गोष्टीरूपात सांगितली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा समवेत मुलींनी झिम्मा, फुगडी असे खेळ सादर केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शिबारानी ह्यांनी केले. शाळेचे उपप्राचार्य श्री.बाळकृष्ण पाटील यांनी कला शिक्षक श्री. संदीप गुणदाळ, श्री. अभिजीत कुन्नूरे, सौ.हर्षदा उभारे. कोमल शिंदे व सौ.आयेशा ह्यांचे विशेष कौतुक केले.कार्यक्रमाचा समारोप सौ. सोनल सावंत यांनी केले.नर्सरी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी ह्या कार्यक्रमाचा आनंद घेतला.
या कार्यक्रमा साठी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. श्रीमती मेघनाताई कोरे मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.