प्रतिष्ठा न्यूज

गांधले पब्लिक स्कूलमध्ये आजी आजोबांचे पाद्य पूजन सोहळा संपन्न

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : गांधले पब्लीक स्कूल येथे शाळेतील विद्यार्थी विधार्थिनीच्या आजी आजोबांचे पाद्य पूजन सोहळ्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.तसेच यावेळी ज्यांनी आपल्या आई वडिलांची मनापासून सेवा केली आहे अशा व्यक्तीचा गौरव समारंभ डॉ.गणेश शत्रुघ्न गांधले चॅरिटेबल ट्रस्टचा मुनीश्वर आश्रम मार्फत करण्यात आला.या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मा.सौ.ज्योतीताई संजय (काका) पाटिल,मा.श्री.नामदेवराव जाधव (जागतिक किर्तीचे लेखक बिझनेस कोच, इतिहास संशोधक प्रभावशाली वक्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष आर्किटेक्चर मा.श्री सचिन कनूजे हे होते. हा कार्यक्रम दि. २५/०२/२३ रोजी संपन्न झाला.आई वडिलांची सेवा करून पुरस्कार प्राप्त झालेल्या व्यक्ती पुढीलपणे श्री सुबराव नारायण नलवडे सावर्डे,इस्माईल राजेमहमंद मुजावर कवठे एकंद,श्री गणपती महादेव पाटील निमणी,श्री जानाजी पांडुरंग चव्हाण मणेराजुरी, श्री.डॉ.प्रभाकर सोनाप्पा डावरे तूरची, श्री शिवाजी आनंदा एडके वासुंबे,श्री रणजीत वसंत खरमाटे वंजारवाडी, जयसिंग रघुनाथ पाटिल मतकुणकी, श्री.विकास नारायण पाटिल तासगाव,श्री.महेश शंकर पवार उपळावीया यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.कार्यक्रमचें आयोजन आचार्य गणेश मुनीजी व सौ जयश्री माँ यांनी केले.कार्यक्रमाचे खास आकर्षण शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकाचे लेखक नामदेवराव जाधव   यांचे व्याख्यानाचा आस्वाद १००० लोकांनी घेतला.कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.