प्रतिष्ठा न्यूज

सांगली विभागीय महिला क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली: सांगली विभागीय महिला क्रिकेट स्पर्धा विलिंग्डन महाविद्यालय सांगली यांनी आयोजित केल्या असून सदर स्पर्धेचे उद्घाटन  समारंभ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी व्ही ताम्हणकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सांगली विभागीय क्रीडा परिषदेचे सचिव प्रा. हर्षकुमार पाचोरे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुरेश कुंभार जिमखाना समिती अध्यक्ष डॉ.राजू कांगणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. प्राचार्यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये महिलांसाठी क्रिकेटमध्ये चांगली संधी आहे त्याचा योग्य वापर करून आपण राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर ती चांगली कामगिरी करावी. तसेच विद्यापीठ स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाचे नावलौकिक करावे असे सांगून स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. या उद्घाटन समारंभाचे स्वागत प्रास्ताविक डॉ.गणेश सिंहासने यांनी केले तर आभार  योगिता परमणे यांनी मांडले
सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ पीएसआय कुमार पाटील  व  पीएसआय प्रमोद खाडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले याप्रसंगी डॉक्टर सुरेश कुंभार उपप्राचार्य जिमखाना समिती अध्यक्ष डॉक्टर राजू कांगणे सांगली विभागीय क्रीडा परिषदेचे सचिव हर्ष कुमार पाचोरे के डब्ल्यू सी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर पी एन गोरे आधी उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय विरुद्ध श्रीमती कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय यांच्यामध्ये अंतिम सामना झाला यामध्ये श्रीमती कस्तुरबा वालचंद महाविद्यालयाने आठ गडी राखून प्रथम क्रमांक मिळविला तर श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय यांनी द्वितीय क्रमांक मिळविला तर विलीन्दन महाविद्यालय विरुद्ध पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील महाविद्यालय तासगाव यांच्यामध्ये तिसऱ्या क्रमांकासाठी सामना झाला यामध्ये पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील महाविद्यालय तासगाव यांनी तिसरा क्रमांक मिळाला सदर विजेत्या खेळाडूंना विलिंग्डन महाविद्यालयाच्या वतीने कायम चषक देण्यात आला या स्पर्धेमधून पहिले तीन क्रमांक अंतर विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरले सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पंच म्हणून सिमोन वाडेकर, सागर आंबे ,अथर्व चंदूरे यांनी काम पाहिले तर श्री अशोक आंबोळे ,गणेश बोंगाळे अनिल कुलकर्णी ,बापू ऐदळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.