प्रतिष्ठा न्यूज

राष्ट्रवादीच्या आ.सुमनताई पाटील गटास भगदाड; यमगरवाडीच्या तीन ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपमध्ये प्रवेश

प्रतिष्ठा न्यूज/अनिल शिंदे
सावळज : तासगाव तालुक्यातील यमगरवाडी येथील राष्ट्रवादीच्या सुमनताई पाटील गटाचे तीन ग्रामपंचायत सदस्य अश्विनी विकास काकडे, छाया तुकाराम काकडे, तसेच मनीषा दादासो डोंबाळे यांनी आज राष्ट्रवादी पक्षास राम राम करत भाजपचे खासदार मा. संजय (काका) पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला तसेच तासगाव तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष सुखदेव (आबा) पाटील व भारतीय जनता युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पै. ऋषिकेश बिरणे यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष प्रवेश पार पडला यासाठी सुखदेव आबा पाटील व ऋषिकेश बिरणे यांनी जोरदार फिल्डिंग लावली होती.
यामुळे राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील गटास भगदाड पडले आहे.
निश्चितच येणाऱ्या काळात सावळज जिल्हा परिषद मतदार संघात मोठ्या प्रमाणावर राजकिय उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सावळज जिल्हा परिषद मतदारसंघात राजकीय समीकरणाची फेर जुळवाजुळव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यावेळी कार्यक्रमास सांगली जिल्ह्याचे खासदार संजय (काका) पाटील,सुखदेव (आबा) पाटील, ऋषिकेश (भाऊ) बिरणे यांच्यासमवेत अनेक मान्यवर मंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.