प्रतिष्ठा न्यूज

तासगावात मराठी पाट्यांवरून मनसे आक्रमक… पाट्या बदला अन्यथा खळखट्याक जिल्हा संघटक काळे

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगांव शहरातील अनेक दुकाने, संस्था,बँक व शासकीय कार्यालये यांच्या पाट्या मराठी भाषेत नसल्याच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निदर्शनास आले आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार दि.२५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत मराठी पाट्या लावण्याची मुदत दिली होती. तरीही आजपर्यंत दुकानावर मराठी पाट्या दिसून येत नाहीत,शॉप अॅन्ड एस्टयाब्लिशमेन्ट कायद्यातील तरतुदीनुसार दुकाने व आस्थापनावरील पाट्या मराठी भाषेत असणे बंधनकारक आहे.परंतु अनेक दुकाने व आस्थापना यांनी कायदेशीर न्यायालयाच्या आदेशाचा भंग केला आहे.तरी नगरपालिका कार्यालयाकडून तत्काळ दुकाने व आस्थापनांनवर कारवाई करून दुकाने व आस्थापनांनवर मराठी पाट्या लावणेत याव्यात अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने खळखट्याक आंदोलन करण्यात येईल असे निवेदन मनसे जिल्हा संघटक अमोल काळे यांनी तासगाव नगरपालिकेला दिले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.