प्रतिष्ठा न्यूज

जूनमध्ये सांगली महापाकेची ८ कोटी ८३ लाख कर वसुली; कर वेळेत भरून सवलत मिळवा आपल्या शहराच्या विकास कार्यात मानकरी व्हा : आयुक्त शुभम गुप्ता

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या हद्दीमधील मालमत्ता धारकांनी ३० जुन २०२४ अखेर मालमत्ता कराचा संपुर्ण भरणा एक रक्कमी भरल्यास, सदर मिळकत धारक आगावु रक्कम भरत असल्याने सामान्य करामध्ये १०% सवलत देण्यात आली आहे, व ३१ जुलै २०२४ अखेर भरल्यास ५% सवलत देण्यात आलेली आहे.

तसेच आपल्या कराचा भरणा डेबीट कार्ड, क्रेडीट कार्ट, युपीआय व ऑनलाईन स्वरुपात भरण्याची सोय महानगरपालिकेकडून केली आहे. जे मालमत्ता धारका आपल्या मालमत्ता कराचा भरणा ऑनलाईन स्वरुपात करत आहेत त्यानां ग्रो ग्रिन या माध्यमातुन प्रत्येक बिलामध्ये र.रु.१० ची सवलत दिली जात आहे. सध्य स्थितीत आज अखेर ३९०० इतक्या मालमत्ता धारकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. तसेच आज अखेर ३५८८ इतक्या मालमत्ता धारकांनी आपल्या कराचा भरणा ऑनलाईन स्वरुपात केलेला आहे. तसेच महानगरपालिकेच्या भरणा केंद्रावर १३१४२ इतकया मिळकत धारकांनी आपल्या कराचा भरणा करुन सहकार्य केले आहे. नागरीकांच्या सोईसाठी भरणा केंद्र शनिवार व रविवार दुपारी ४-०० वाजेपर्यत सुरु ठेवलेली आहेत. आज अखेर ऑनलाईन व भरणाकेद्रावर र.रु.८ कोटी ८३ लाख इतक्या रक्कमेची कराची वसुली झाली आहे. तरी आपल्या थकीत व चालु कराचा भरणा लवकरात लवकर करुन महानगरपालिकेस सहकार्य करावे. ज्या मिळकत धारकांना आपल्या बिलाबाबत शंका असले अशा मिळकत धारकांनी घरपट्टी विभागाशी संपर्क साधावा.

मिळकत धारक एक रक्कमी बिल भरु शकत नसलेस अंशतः (पार्ट पेमेंट) भरुन घेण्याची सोय आहे. मात्र त्यावर सदर सवलत मिळू शकणार नाही. मात्र मुदतीत रक्कम भरली नाही तर सदर मागणी रक्कमेवर दंडाची आकारणी होईल. यासाठी सर्व मालमत्ता कर दात्यांनी जुन २०२४ अखेर कराची संपूर्ण रक्कम भरून १०% तर जुलै २०२४ अखेर भरुन ५ % सामान्य करात सवलतीचा लाभ घ्यावा. असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.