प्रतिष्ठा न्यूज

आशिष वडजे मेमोरियल फाउंडेशन यांचे सौजन्याने स्पर्धा परीक्षा-अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्राचे मा. जिल्हाधिकारी राऊत यांचे हस्ते उदघाटन

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : तालुका मुखेड येथे आशिष वडजे मेमोरियल फाऊंडेशन यांच्या सौजन्याने स्पर्धा परीक्षा व पुस्तकासह मोफत अभ्यासिकेचे आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र कार्यक्रमाचे उदघाटन दि.17 फेब्रुवारी 2023 रोज शुक्रवारी सकाळी- 9 वाजता, नांदेड चे जिल्हाधिकारी मा. अभिजित राऊत साहेब, यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम चौधरी फंक्शन हॉल- मुखेड येथे संपन्न होणार आहे.
यावेळी वैजनाथ कमठेवाड- सदस्य, महाराष्ट्र राज्य विक्रीकर न्यायाधिकरण, डॉ.हरिदास राठोड- प्राचार्य- सेवादास महाविद्यालय वसंतनगर, मुखेड. मा.डॉ.मनोहर तोटरे- प्राचार्य- शाहीर अण्णाभाऊ साठे महाविद्यालय, मुखेड. मा.डॉ. शिवानंद अडकीने- प्राचार्य- महात्मा ज्योतीबा फुले महाविद्यालय, मुखेड.
मा. नारायण पांडे- प्राचार्य- नरसिंह विद्या मंदिर उमरदरी, मुखेड. मा. कैलास मुंडकर- मुख्याध्यापक- द-ब्राईट स्टार इंग्लिश स्कुल, उमरदरी. माजी सैनिक ज्ञानेश्वर पाटील डुमणे- संचालक- राजे छत्रपती अकॅडमी, मुखेड. आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी मुखेड तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,
असे आवाहन आयोजक- मा.आबाजी वडजे पाटील- राज्यकर सहआयुक्त मुंबई व सहकारी यांनी केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.