प्रतिष्ठा न्यूज

सुस्थितीत रस्त्यावर करण्यात येत आहे २९ कोटींचा खर्च; मिरज- सांगली रस्ता कामाची होणार चौकशी ; पुणे प्रादेशिक कार्यालयाचे आदेश ; मिरज सुधार समितीने केली होती तक्रार

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : मिरज-सांगली रस्ता हा ९५ टक्के सुस्थितीत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुन्हा रस्त्यावर रस्ता चढवून सुमारे २९ कोटींचा चुराडा केला जात असल्याची तक्रार मिरज सुधार समितीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडे केली होती. याचीच गंभीर दखल घेत पुणे सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक कार्यालयाने कोल्हापूर अधिक्षक अभियंता यांना गैरकारभाराची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याने सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांसह ठेकेदाराचे धाबे दणाणले आहेत.

मिरज-सांगली रस्त्यावर कायम वाहतूक कोंडीबरोबरच अपघात वाढल्याने हा रस्ता सहा पदरीकरण करणे गरजेचे आहे. काही ठिकाणी रस्ता शेजारी खासगी मिळकत संपादित करावी लागणार आहे. त्यासाठी मोठा निधी खर्च लागणार आहे. ही वस्तुस्थिती असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने महात्मा गांधी चौक ते सांगलीच्या कर्मवीर भाऊराव पाटील चौकापर्यंत हा सुमारे10 किमी अंतराचा 95 टक्के सुस्थितीत असणारा मिरज- सांगली रस्त्यासाठी सुमारे २९ कोटींचा निधीचा चुराडा केला जात आहे. केवळ ठेकेदाराला पोसण्यासाठी आणि टक्केवारी लाटण्यासाठीच हा खटाटोप सुरू असल्याचा आरोप करीत स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करून दोषी बांधकाम अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी मिरज सुधार समितीने केली होती. याची गंभीर दखल घेत पुणे सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक कार्यालयाने या गैरकारभाराची चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश कोल्हापूर अधिक्षक अभियंता यांना दिले असल्याची माहिती मिरज सुधार समितीचे अ‍ॅड. ए. ए. काझी यांनी दिली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.