प्रतिष्ठा न्यूज

मिरज विधानसभा मतदारसंघातून प्रा. मोहन वनखंडे (सर) इच्छुक ; पत्रकार परिषदेत केली घोषणा

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी: आगामी विधानसभा निवडणुकीत मिरज विधानसभा मतदारसंघातून मी भाजपाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. यासाठी भाजपाचे जिल्हा नेतृत्व, प्रदेश नेतृत्व कडे उमेदवारीची मागणी करणार आहे. अशी माहिती भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रा. मोहन वनखंडे (सर) यांनी पत्रकारांना दिली.
1995 पासून मी राजकारणात सक्रिय आहे. गेली वीस वर्ष भाजपासोबत असून पक्ष नेतृत्वाने दिलेली जबाबदारी मी अतिशय निष्ठेने पार पाडली आहे. यामध्ये २००४ साली जत विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख, २००९,२०१४ आणि २०१९ मध्ये मिरज विधानसभा व लोकसभा निवडणूक प्रमुख, माजी मंत्री प्रकाश जावडेकर ,चंद्रकांत दादा पाटील यांचे पदवीधर निवडणुकीत एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून सक्रिय, माजी आमदार भगवानराव साळुंखे यांचे शिक्षक मतदार संघातही सक्रिय सहभाग , सांगली जिल्हा परिषद व मिरज पंचायत समिती निवडणुकीत २०१७ मध्ये जिल्हा कोअर कमिटी सदस्य म्हणून भाजपाला यश मिळवून देण्यात मोठा वाटा, २०१८ च्या महापालिका निवडणुकीत कोअर कमिटी सदस्य म्हणून कार्यरत असताना महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकविण्यात मोठा सहभाग, पत्नी सौ. अनिता वनखंडे समाजकल्याण सभापती म्हणून कार्यरत झाल्यानंतर सहकारी नगरसेवकांच्या मदतीने महापालिका क्षेत्रात ७८ कोटी रुपयांची विकास कामे करण्यात यश, अशा अनेक कामांमुळेच जनतेशी निर्माण झालेल्या संपर्काच्या जोरावर पक्षाकडे उमेदवारी मागण्याचा माझा हक्क आहे. असा दावा प्रा.वनखंडे यांनी यावेळी केला.
सध्या मिरज विधानसभा मतदारसंघ आरक्षित असल्याने, मला न्याय मिळावा म्हणून पक्षश्रेष्ठींकडे दाद मागणार आहे.
सध्या मी भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचा प्रदेश सरचिटणीस म्हणून कार्यरत आहे. याशिवाय मिरज विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून मी माझी जबाबदारी अतिशय निष्ठेने पार पाडली आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मिरज विधानसभा मतदारसंघात तीन वेळा भाजपाचा झेंडा फडकवून ‘हॅटट्रिक’ साधण्यात निश्चितच माझा खारीचा वाटा आहे. भाजपा जिल्हा कोअर कमिट सदस्य म्हणून पक्षासाठी केलेले कार्य उल्लेखनीयच आहे.
शहरातील नामवंत विद्या मंदिर प्रशालेत 29 वर्षे शिक्षक म्हणून उत्कृष्ट सेवा बजावली. या कालावधीत जवळपास 20 हजार हून अधिक विद्यार्थी उच्चपदस्य अधिकारी,डॉक्टर, इंजिनियर, वकील,व्यावसायिक म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय गुरुकुल शिक्षण संस्था ,ज्ञान प्रबोधनी विद्यालय (अनुदानित), माऊली प्रतिष्ठान मिरज, श्री संत रोहिदास समाज सुधारक मंडळ शेगाव (ता. जत )विद्यमान अध्यक्ष आणि संजय गांधी निराधार कमिटी मिरज शहर तालुका माजी अध्यक्ष, दत्त नागरी सहकारी पतसंस्था मिरज माजी उपाध्यक्ष, वनखंडे कन्स्ट्रक्शन प्रा. लिमिटेड, चैतन्य माऊली डेव्हलपर्स, एल.एल.पी., 700 कोटीची उलाढाल असलेल्या शिक्षण सेवक सहकारी सोसायटी सांगली, चे माजी व्हाईस चेअरमन आणि मिरजेच्या विद्या सहकारी सोसायटीत सचिव म्हणून महत्वपूर्ण जबाबदारी बजावली आहे.
आपल्या विचाराच्या असणाऱ्या ‘शिक्षक परिषदे’च्या माध्यमातून पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात ज्या- त्यावेळी भाजपा पक्षश्रेष्ठीने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. महाराष्ट्र प्रदेश एस. सी मोर्चाचा सरचिटणीस म्हणूनही मी कार्यरत होतो. याशिवाय शिक्षण क्षेत्रात काम करताना चळवळीच्या माध्यमातून शिक्षण सेवक बँकेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून मी केलेले काम उल्लेखनीय आहे. असा दावा प्रा. वनखंडे यांनी केला.
मी गेल्या वीस वर्षात भाजपासाठी दिलेले योगदान, काँग्रेसच्या अधिपत्याखाली असलेल्या मिरज विधानसभा मतदारसंघात भाजपाला तीन वेळा मिळालेला विजय, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पक्ष उमेदवाराच्या विजयासाठी प्रामाणिक पणे केलेले कार्य, विद्यार्थ्यांबरोबर संघटना पातळीवरील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी असलेली जवळीक, याची दखल घेऊन भाजपा प्रदेश पक्षश्रेष्ठीने आगामी विधानसभा निवडणुकीत मिरज विधानसभा मतदारसंघातून पक्षाचा उमेदवार म्हणून माझा विचार करावा. अशी मागणी प्रा.वनखंडे यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.