प्रतिष्ठा न्यूज

मुंबईत रेल्वेखाली जाणाऱ्या तरुणीचे प्राण वाचवल्या बद्दल तासगावात अभिजित जाधव व ओंकार नलवडे यांचा सत्कार

प्रतिष्ठा न्यूज / किरण कुंभार
तासगाव : मुंबई येथील एका रेल्वे स्टेशनवर रेल्वे रुळाखाली जाणाऱ्या तरुणीचे प्राण वाचवले त्याबद्दल मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारे तासगाव येथील अभिजीत जाधव, तसेच, नुकतेच मुंबई पोलीस दलात नियुक्त झालेले ओंकार नलवडे यांचा सत्कार तासगाव शहर व तालुक्याच्या वतीने करण्यात आला. सदर सत्कार समारंभ कार्यक्रमास तासगाव शहर व तालुक्यातील राजकीय, सामाजिक, उद्योग व पोलीस दलात कार्यरत असणारे अनेक मान्यवर उपस्थित होते.

मुंबईतील एका रेल्वे स्टेशनवर एक तरुणी आपल्या सहकाऱ्यांसमवेत रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करत असताना तिचा तोल जावून ती थेट रेल्वे आणि पटरीत अडकली काही सेकंदात ती रेल्वे रुळाखाली जाणार इतक्यात प्रसंगावधानता राखून तिला ओढून बाजला करणाऱ्या मुंबई पोलीसाचे महाराष्ट्र राज्यात सर्वत्र कौतुक होत आहे. हा मुंबई पोलीस दुसरा, तिसरा कोणी नसून तासगाव शहरातील वरचे गल्लीतील अभिजीत जाधव आहेत. यांच्या कामगिरीबद्दल तासगावकरांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

तसेच, वरचेगल्ली परिसरातील एका गरीब कुटुंबातील ओंकार नलवडे या तरुणाने अत्यंत प्रतिकुल परिस्थितीशी सामना करीत मुंबई पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण केले. त्याबद्दल त्यांचाही तासगावकरांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी, अभिजित जाधव व ओंकार नलवडे यांनी उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले.

सदर सत्कार समारंभा वेळी मा.सुधीर नलवडे, मा.सतीश लिंबळे, मा.पांडुरंग जाधव, मा.शरद शेळके, मा.सिद्धेश्वर पवार, मा.किरण देवकुळे, यांनी मनोगते व्यक्त केली.

यावेळी मा.रणजीत जावीर, मा.संतोष पेठकर, मा.विकास सूर्यवंशी, मा.रणजीत आडसूळ, मा.महेश सूर्यवंशी, मा.संतोष माळी, मा.निलेश फडतरे, मा.राहुल माने, मा.समीर कोळी, मा.गंगाधर देवकुळे, मा.विजय जाधव व अन्य अनेक मान्यवर आदी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.