प्रतिष्ठा न्यूज

छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित खुल्या रोलर रिले स्केटिंग स्पर्धेत मुंबई संघ विजेता- तर अहमदनगर उपविजेता संघ

प्रतिष्ठा न्युज /वसंत सिरसाट
नांदेड : छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या 39 व्या रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या खुल्या रोलर रिले स्केटिंग स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत महाराष्ट्रातील यजमान छत्रपती संभाजीनगर, मुंबई, ठाणे, पुणे, अहमदनगर, धुळे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, सोलापूर, पालघर, सातारा येथील 350 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत रिलेव्हन रिलेटिव्ह व स्पीड ड्रेस अशा तीन वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या. ओव्हर ऑल चॅम्पियनशिप मुंबई संघाने प्रथम विजेते पदक पटकावले. द्वितीय संघ अहमदनगर, तृतीय छत्रपती संभाजीनगर, चतुर्थ संघ ठाणे, तर पाचवे विजेते पदक नाशिक जिल्ह्याने मिळविले. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांची व्हिएतनाम येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा छत्रपती संभाजी नगरचे जिल्हा क्रीडा अधिकारी- मा. बालाजीराव देसाई, रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव- भिकन अंबे, सहसचिव- अड्व्हकेट संगीता भट्टड, उपाध्यक्ष- किशोर जाधव यांच्या हस्ते देण्यात आला. याप्रसंगी राज्य संघटनेच्या सचिव- राधिका भिकन अंबे, खजिनदार- नितीन काथोटे, साईनाथ थोरात, राज्य संघटनेचे सदस्य- धनंजय पाटील (धुळे), मनीषा गरवालिया (बदलापूर), मुकुंद चव्हाण ( मुंबई), गणेश रोडे ( सोलापूर), प्रदीप पाटोळे (अहमदनगर), दीपक चव्हाण (पुणे), पवन सर (कल्याण), विनोद निकुळे (नागपूर), जावेद शहा (नाशिक), यांची उपस्थिती होती. स्पर्धेदरम्यान पंच म्हणून पूजा अंबे, गणेश बनसोडे, सूरज गरवालिया, साई अंबे, पवन पवार, नेहा चव्हाण यांनी भूमिका पार पाडली.
   रिले स्पर्धेचा अंतिम निकाल खालील प्रमाणे:
क्वाड स्केट
                       U – 6
1) वेदांत टिंगरे, पवन राजपूत, श्रेयांश ताक
2) नीरज गवळी, जितेज घाडगे, विहान गुंजाळ
                       U – 9
1) अर्णव ढवळे, वैभव घोडके, अर्णव हसरे, आरव ढवले, 2) आरूष पाटील, वंश गांधी, अवधूत थत्तेकर, रुद्र डांगर, 3) याधेश चव्हान, अर्जुन कुरिल, सिद्धार्थ कूरील, अर्णव भोईर
                       U – 12
1) श्लोक मोरे, वेद पाटील, आदित्य सिंग,अर्पित शिंदे,
2) काविर पाटील, रुद्र सोमनाथे, आरव शर्मा,श्लोक महात्रे, 3) चंद्रमणी शिरोळे, हेनील पटेल, साई रसाळ,
दिवित सिंग
                       U – 15
1) रियांशू सिल, राज कांठे, मुसतफा मुल्ला, शक्ती पिल्ले 2) प्रेम चौधरी,धनंजय पाटील, शिवम महाजन,
मानस भोईर 3) प्रतिक जाधव, आराध्य फांसेकर, तनय कोळपे, ध्रुव खैरनार
                फॅन्सी इनलाईन
                       U – 9
1) यशस्विनी सावंत, दुर्वा मोरे, आराध्य देशमुख,
गौरी शृंगारपुरे 2) स्वरा वाघोलेकर, ईशा पवार, वैष्णवी कापसे, आर्या चव्हाण 3) तन्वी खैरे, तनिष्का काजभजे, प्रेरणा दास, भुविषा गवले
                       U – 12
1) अर्णव भोईर, श्रेया सोळुंके, विराज सोनवणे, 2) तेजोमय सपकाळ, वेदांत पवार, ध्रुव जैस्वाल 3)गणेश अगरवाल, विराज जाधव, जीतेज घाडगे
                       U – 15
1)ऋग्वेद टिंगरे, साई भिसे,आर्यन शिंदे, श्रेयस वाघचौरे 2) कुंश वासिंकर, दिव्यांशू महतो, कैवल्य भांडवलकर, वंश जांजले
   प्रोफेशनल ईनलाईन
                       U – 12
1) सिद्धार्थ कूरिल, अर्जुन कूरिल, सर्वेश मोटीकर, आलिया शहा, 2) भाग्यश्री पवार, सिया काबरा, काव्या पटेल, रजनंदिनी मोरे
                    खुलागट
1) साई भिकन अंबे, वीर रोडीया, प्रणव काळे, ऋग्वेद टिंगरे 2) सुजल शेंद्रे, सोहम मेहेर, अनुराग देशमुख
परम दिघे 3) विघ्नेश पवार, तेजस कदम, उत्कर्ष राठोड, प्रेम पगारे
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.