प्रतिष्ठा न्यूज
आपला जिल्हा

गगनबावड्यात ‘कोसळधार’ कुंभी धरण क्षेत्रात उच्चांकी पाऊस

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : काल गगनबावडा तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. आज सकाळी संपलेल्या २४ तासात १४० मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. तर कुंभी धरण क्षेत्रात या हंगामातील  उच्चांकी म्हणजे १८१ मि. मी. पाऊस झाला. तर आज अखेर एकूण  १८५८मि. मी. पाऊस झाला आहे. कुंभी धरण ५९.३२ टक्के भरले आहे. तालुक्यातील कोदे व वेसरफ ही धरणे यापूर्वीच पूर्ण क्षमतेने  भरलेली आहेत.
तालुक्यात पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे. नदी,नाले तुडुंब भरून वाहत आहेत,भात लावणीला वेग आलेला आहे.
गतवर्षी अतिवृष्टीमुळे  भूस्खलन, दरडा कोसळणे, घरांची पडझड  झालेली होती. त्यामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. सध्या अतिवृष्टी होत असल्याने तालुका प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याच्या  सूचना केलेल्या आहेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.