प्रतिष्ठा न्यूज

विद्यामंदिर हायस्कूल, सांगली येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : लोकनायक शिक्षण मंडळ संचालित विद्यामंदिर हायस्कूल, सांगली येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योजक विद्याधर दिवाण सर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी अनेक प्रोजेक्ट तयार केले होते त्याची पाहणी करून विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक दिवाण सरांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी विज्ञान विभाग प्रमुख सौ. मानकापूरे मॅडम यांनी विज्ञान दिनाचे महत्त्व व सी. व्हीं. रमण यांची माहिती दिली. सर्व उपस्थित त्यांचे आभार श्री.इंपाळ यांनी मानले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.