प्रतिष्ठा न्यूज

मराठी माध्यमात शिकणारी मुलंच गुणवत्तेत आघाडीवर : जेष्ठ साहित्यिक भीमराव धुळूबुळू

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : मराठी माध्यमात शिकणारी मुलंच गुणवत्तेत आघाडीवर रहातात.केवळ इंग्रजित शिकली नाहीत तर मुलं मागं पडतील हा न्यूनगंड काढून टाकला पाहिजे.असे उद्गार जेष्ठ साहित्यिक व शिक्षण क्षेत्रातील जेष्ठ मार्गदर्शक भीमराव धुळूबुळू यांनी मिरज हायस्कूल मिरज येथे मराठी भाषा गौरव दिनी पारितोषिक वितरण प्रसंगी काढले यावेळी अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे होते . ते पुढे म्हणाले पहिली पाचसात वर्षं भाषा शिकायच्या नादात ज्ञानाच्या मूळ संकल्पनाच इंग्रजी माध्यमातील मुलांच्या आकलनात येत नाहीत.सभोवताली इंग्रजी माध्यमांचे कौरव वेढत असतांना मराठी भाषेचा गौरव करायचा आहे.आणि देवनागरी लिपीतील भाषाच शुध्द भाषा आहेत जसे बोलतो तसे लिहिता येणा-या पण जगावर इंग्रजानी राज्य केल्यांने इंग्रजी जगात गेली.संतांनी व साहित्यिकांनी मराठी समृध्द केली आहे.या प्रसंगी वर्षभरात विविधक्षेत्रात प्राविण्य मिळवणा-या विद्यार्थ्याना पारितोषिके देण्यात अाली.
स्वागत प्रास्ताविक सुर्यवंशी सरांनी केले. सौ माळी आळतेकर यांनी व विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली.सूत्रसंचलन सौ कोरे यांनी केले .

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.