प्रतिष्ठा न्यूज

सांगलीचे माजी आयुक्त नितीन कापडणीस यांनी घेतला ढोल वादन आंदोलनाचा धसका : ०६ आक्टोबरला सोडणार निवासस्थान

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी दि. ०३: तत्कालीन आयुक्त नितीन कापडणीस यांची सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका येथून दिनांक ११/०८/२०२२ रोजी बदली झाली होती. त्यांना त्याच दिवसी कार्यमुक्त करण्यात आले होते. शासन नियमानुसार बदली कालखंडदेखिल संपला आहे. असे असताना महापालिकेच्या आयुक्त निवास तेथील कर्मचार्‍यासह ते कोणतीही पुर्व परवानगी न घेता वापरत होते. जिल्हा संघर्ष समितीने दिनांक २७/०९/२०२२ रोजी महापालिका आयुक्त आणि सांगली शहर पोलिस ठाण्यास पत्र देऊन पाच दिवसांत बंगला न सोडल्यास दिनांक ०३/१०/२०२२ सकाळी ११.०० पासून ते त्यांनी निवासस्थान सोडेपर्यंत ढोल वाजवून जनआंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
आंदोलनचा इशारा देताच कार्यतत्पर नितीन कापडणीस यांनी दिनांक २८/०९/२०२२ रोजी ईमेलद्वारे निवासस्थान वापरण्यासाठी अर्ज केला. तो करण्यास उशीर झाल्याची हास्यास्पद कारणे सांगुन दिनांक ०६/१०/२०२२ पर्यंत निवासस्थान वापरू देण्याची विनंती केली. तसेच या ईमेलसोबत बादरायण संबध असलेला सार्वजनिक बांधकाम विभागाचा गैरलागू शासन निर्णय जोडला होता. या शासन निर्णयानुसार बदली झाल्यानंतर फक्त ७ दिवसच निवासस्थान वापरण्याची परवानगी आहे. अपवादात्मक परिस्थितीत पुर्व परवानगीने तीन महिने दंडात्मक शुल्क भरून वापरण्यास अनुज्ञेय आहे. पुर्व परवानगी घेण्याची नैतिक जबाबदारी नितीन कापडणीस यांची होती त्यांनी तसे केले नाही. ढोलवादन आंदोलन होऊ नये म्हणून महापालिका प्रशासन रविवारी कार्यालयात हजर राहून संघर्ष समितीस पैसे भरून दिलेली मंडप परवानगी नाकारत असलेचे पत्र दस्तुरखुध्द सहाय्यक आयुक्त श्री. एस. एस. खरात यांनी तयार केले; आणि स्वत: ते समितीच्या कार्यालयात देण्यास आले. नितीन कापडणीस बंगला कधी सोडणार? याबाबत कोणतेही ठोस लेखी हमीपत्र मिळाले नसल्यामुळे संघर्ष समितीने आंदोलनचा आपला निर्णय कायम ठेवला. त्यानंतर सांयकाळी पुन्हा महापालिका प्रशासनामार्फत लेखी पत्र समितीस देउुन आंदोलन न करण्याची विनंती केली. हीच कार्यतत्परता नागरीकांची कामे करण्यासाठी न वापरता, सनदशीर मार्गाने होउु घातलेले आंदोलन दडपण्यासाठी महापालिका प्रशासनाने रविवारी सुट्टीदिवसी केलेल्या कामकाजाबाबत नागरीक आणि समाजमाध्यमातून खमंग चर्चा होत आहे.
श्री. तानाजी रुईकर, आर्की. रविंद्र चव्हाण, श्री. असिफ मुजावर, श्री. बबलु मुजावर, श्री. राजु ऐवळे, श्री. सुनिल गिड्डे, श्री. गोरख वनखडे, श्री. संतोष कदम, श्री. सागर शिंदे, श्री. रियाज मुल्ला, श्री. संतोष शिंदे यावेळी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.