प्रतिष्ठा न्यूज

गुलाबराव पाटील डी. एड्. कॉलेजमध्ये योग कार्यशाळा संपन्न

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : विद्यार्थ्यांच्या आरोग्य संवर्धनात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते. आरोग्यसंपन्न शिक्षकच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करु शकतात हा .. गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलाचे पायाभूत शैक्षणिक तत्वज्ञान आहे. भावी शिक्षकांना योगाचे ज्ञान असणे व त्यांनी नियमित योगा करण्यासाठी मिरज येथील गुलाबराव पाटील डी. एड्. कॉलेजमध्ये योग कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी पंढरपूर येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील योगा विभागाचे प्राचार्य डॉ. अशोक ननवारे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना योगाबददलचे महत्व सांगून प्रत्येक विद्यार्थ्याने दररोज 20 मिनिट योगा केला पाहिजे. योगासन केल्याने मन, बुध्दीची एकाग्रता वाढते तसेच शरीर निरोगी ठेवायचे असेल तर योगा शिवाय पर्याय नाही.
यावेळी डी. एड्. कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी. एन. कराळे सहा. प्राध्यापक श्रीमती अस्मिता कोडग, दिव्या पाटील व डी. एड्. चे प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.