प्रतिष्ठा न्यूज

सांगली : महादेव कॉलनी, प्रभाग क्रमांक-४ येथील रहिवाश्यांच्या समस्यांवर कारवाई न केल्यास आम आदमी पार्टी महानगर पालिकेवर मोर्चा आंदोलनाचा इशारा

प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली : आम आदमी पार्टीच्या जनसंपर्क अभियानांतर्गत प्रभाग क्रमांक-४ येथील स्थानिक रहिवाश्यांनी महादेव कॉलनी येथील समस्या आमच्या समोर मांडल्या आहेत. येथे अद्याप कमी दाबाने पिण्याचा पाण्याचा पुरवठा होत असून रहिवाश्यांना दिवसातून केवळ दोन तासच पाणी मिळते. शेजारी दोन पाण्याच्या टाक्या असून देखील अद्याप इथे महापालिकेची अमृत योजना पोहचली नाहीये.
ड्रेनेजची व्यवस्था जरी असली तरी मक्तेदाराने कुठेही लेव्हल मेंटेन न केल्याने पावसाळ्यात ड्रेनेजचे पाणी तुंबून रहिवाश्यांच्या घरात जाते. तसेच बाकीच्या गल्ल्यांमध्ये नवीन LED स्ट्रीट लाईटची सुविधा उपलब्ध करून दिली गेली आहे मात्र एका गल्लीत जुन्याच लाईटस असून त्यादेखील बंद अवस्थेत असल्याने रात्री याभागात पूर्णतः अंधार पसरलेला असतो व अनेक विषारी प्राणी इथे फिरत असतात. याच बरोबर मोकाट जनावरांचा तर येथे राबताच असतो. सदर मागण्यांवर जर महानगर पालिकेने त्वरित कारवाई न केल्यास मंगळवार दि:२८.०२.२३ रोजी स्थानिक नागरिकांच्या मदतीने महानगर पालिकेवर तीव्र आंदोलन मोर्चा काढण्यात येईल असा इशारा सांगली जिल्हा शहर समिती उपाध्यक्ष आरिफ मुल्ला यांनी दिला. यावेळी पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव वासिम मुल्ला, जिल्हा शहर समिती सचिव  युवराज मगदूम, संघटक फय्याज सय्यद, ख्वाजासाहेब जमादार, संतोष मगदूम, अमोल पवार तसेच स्थानिक रहिवासी यासिन मुल्ला, समीर काझी,अल्ताफ फकीर, संतोष यादव, सुरेश लाला यादव ,रफिक शेख आदि उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.