प्रतिष्ठा न्यूज

तासगावात आबांच्या पुण्यतिथी निमित्त खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा उत्साहात संपन्न : पहिल्याच वर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद ; आयोजक राहुल जाधव…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : महाराष्ट्राचें माजी उपमुख्यमंत्री स्व.आर आर आबा पाटील यांच्या पुण्यस्मरणार्थ आर आर आबा पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून राहुल जाधव यांच्या संकल्पनेतुन आणि रोहित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आर आर करंडक खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचें आयोजन करण्यात आले होते.यामध्ये ठाणे येथील ज्ञानसाधना नाट्यपरिवार यांनी सादर केलेल्या “पडदा” या एकांकिकेने प्रथम क्रमांक मिळावला.पहिल्याच वर्षी आयोजित या स्पर्धेतील मानाचा करंडक या संघाने पटकावला.स्व. आर आर पाटील आबा प्रतिष्ठान यांच्या वतीने राहुल जाधव यांच्या संकल्पनेतुन साने गुरुजी नाट्यगृहात या स्पर्धा पार पडल्या.यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या स्पर्धेत संपूर्ण राज्यभरातील २३ संघांनी सहभाग घेतला होता.ज्ञानसाधना नाट्यपरिवार ठाणे यांनी सादर केलेल्या “पडदा” या एकांकिकेला प्रथम क्रमांक मिळाला. द्वितीय क्रमांक डावा क्रिएशन अलिबाग यांनी सादर केलेल्या “मेन एन ब्लॅक” या एकांकिकेस मिळाला, तर तृतीय क्रमांक कलासक्त मुंबई “ओल्या भिंती” आणि विवेकानंद कॉलेज,कोल्हापूर यांनी सादर केलेल्या “चफी” या दोन्ही एकांकिकेस विभागून मिळाला.उत्कृष्ट अभिनय स्त्री-राजश्री जमदाडे (ओल्या भिंती), पुरुष अनिकेत कदम (समांतर), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक-अजय पाटील (पडदा),सर्वोत्कृष्ट लेखक सोमनाथ सोनवलकर(ओल्या भिंती), सर्वोत्कृष्ट पाश्र्वसंगीत ऋषीकेश देशमाने (चफी), सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना- राजेश शिंदे (टीनिटस), सर्वोत्कृष्ट नैपथ्ययोजना-वेदांत पावसकर, ममता गुप्ता (भैय्या), सर्वोत्कृष्ट रंगभूषा-केदार ओठवणेकर (यासणी मायणी यासले) यांना प्रदान करण्यात आला. विजयी संघ व कलाकारांना माजी नगराध्यक्ष अमोल शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष गजानन खुजट,युवक अध्यक्ष अभिजित पाटील,ग्रामपंचायत सदस्य विकास म्हस्के,महिला अध्यक्षा नलीनी पवार, माजी नगरसेविका शुभांगी साळुंखे, यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून बाळ बरगाले,कुरणे सर यांनी काम पाहिले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.