प्रतिष्ठा न्यूज

सांगलीतील संभाव्य पूर परिस्थिती बाबत आयुक्तांनी घेतला आढावा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : दोन दिवस सातत्याने पडत असलेला पाऊस आणि कोयना धरण परिसरातील पाऊस या मुळे आज आयर्विन पूल पाणी पातळी साधारणपणे १८ फूट पर्यत झाली आहे.

महापालिका प्रशासन सतर्क झाले असून सर्व अधिकारी, कर्मचारी यांना आयुक्त यांनी स्पष्ठ सूचना दिल्या आहेत.
एन डी आर एफ टीम आणि अग्निशमन दलाच्या जवान तसेच मनपा अधिकारी कर्मचारी संभाव्य आपत्ती साठी तयार आहेत ,
आपत्ती व्यवस्थापन केंद्र या ठिकाणी शुभम गुप्ता आयुक्त यांनी भेट देऊन सर्व बाबीची माहिती घेतली आहे,
पूर बाधित क्षेत्रातील नागरिकांना या पूर्वीच आवश्यक त्या साहित्याची यादी प्रसिध्द केली आहे, त्या यादी नुसार नागरिकांनी साहित्य घेऊन स्थलांतरित होणे गरजेचे आहे,
मनपा वतीने निवारा केंद्र आणि संपर्क नंबर देखील प्रसिद्ध केले आहे,
आपत्ती प्रसंगी संपर्क साधण्यासाठी खालील नंबर आहेत.
70 660 40 330
70 660 40 331
70 660 40 332
पूर बाधित क्षेत्रातील
नागरिक ,रहिवाशी, व्यापारी यांनी वरील नंबर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.