प्रतिष्ठा न्यूज

कुष्णुर चे माजी सरपंच माधवराव पाटील जाधव ( बापु ) यांचे निधन

प्रतिष्ठा न्यूज/ वसंत सिरसाट

उमरा : नायगाव तालुक्यातील कुष्णुर येथील जेष्ठ नागरिक तथा शेतीनिष्ठ शेतकरी कै.माधवराव गंगाराम पाटील जाधव यांचे आज दि 6 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 1 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले, मृत्यू समयी त्यांचे वय 95 वर्षे होते.
कै.माधवराव पाटील जाधव हे कुष्णुर गावचे 15 वर्षे सरपंच होते तसेच ते आजतागत निर्व्यसनी होते.
त्यांना शेती बरोबर राजकारणाची पण खुप आवड होती.
ते गावातील सज्जन व जेष्ठ नागरिक असल्यामुळे माजी मुख्यमंत्री मा.अशोकराव चव्हाण यांनी त्यांचा सत्कार केला होता.
कै.माधवराव पाटील यांना गावसह कुष्णुर परिसरातील सर्वजण ‘बापु” या टोपण नावाने ओळखत होते.
त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातु, पणतू, असा मोठा परिवार असुन त्यांचा अंत्यविधी उद्या दि 7 ऑक्टोबर 2022 रोज शुक्रवारी 11 वाजता मुळ गावी कुष्णुर येथे होणार आहे.
ते नांदेड येथे शिक्षक असलेले व्यंकट जाधव यांचे वडील होते.
   ” प्रतिष्ठा न्युज आपल्या दुःखात सहभागी आहे”
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.