प्रतिष्ठा न्यूज

जागतिक होमिओपॅथिक दिन गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुल मिरज येथे उत्साहात संपन्न

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : जागतिक होमिओपॅथिक दिवसाचे औचित्य साधून गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुल मिरज येथे सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये शैक्षणिक 2022-23 या वर्षांमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन, अनेक खेळांच्या स्पर्धेत भाग घेऊन विजयी झालेले तसेच, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे परीक्षेत उज्वल यश संपादन केलेले विद्यार्थी, वार्षिक सोशल गॅदरिंग, कल्चर कार्यक्रमात भाग घेऊन क्रमांक मिळवलेले व नॅशनल कमिशन ऑफ होमिओपॅथी 2020 मध्ये दोन विद्यार्थी डॉ. श्रोतिका टेक्के व डॉ. ऐनम शेख यांचे रिसर्च पेपर मंजूर झाले बद्दल या सर्वांना सर्टिफिकेट, पारितोषिक प्रदान करण्यात आले.
गुलाबराव पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे प्रोफेसर डॉ. प्रताप भोसले यांची महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे पॅरा क्लिनिकल होमिओपॅथिक अभ्यास मंडळावर निवडून आल्याबद्दल व डॉ. तेझीन अब्दुलसलाम बिडीवाले मॅडम यांची महाराष्ट्र शासन होमिओपॅथिक सल्लागार मंडळ वर निवड झाल्याबद्दल दोघांचा शाल श्रीफळ व बुके देऊन मा. संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. श्वेता मेहता मॅडम यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला यावेळी प्राचार्य डॉ. राजेंद्र मेथे, कॅम्पस डायरेक्टर सतीश पाटील, उपप्राचार्य डॉ. सुहास पाटील, सर्व शाखांचे विभाग प्रमुख व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह, सीआर, एलआर, जीएस, सर्व स्टुडन्ट कौन्सिल व विद्यार्थी उपस्थितीत होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.