प्रतिष्ठा न्यूज
आपला जिल्हा

तासगाव कवठे महांकाळ शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी सचिन ज्ञानेश्वर शेटे यांची नियुक्ती…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : संपूर्ण राज्यात सुरु केलेल्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून गोर-गरीब,गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांत (१०%+१०%) राखीव खाटा उपलब्ध करुन देणे,निकषात बसत असलेल्या गरीब रुग्णांवर पुर्णतः मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यासंदर्भातील मदत तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांना शस्त्रक्रिया मोफत करणे संदर्भात योग्य मार्गदर्शनासाठी तसेच गंभीर-महागड्या शस्त्रक्रिया करावयाच्या असलेल्या गोरगरीब गरजू रुग्णांना भरीव प्रमाणात अर्थ सहाय्य व्हावे याकरीता पंतप्रधान वैद्यकीय सहाय्यता निधी,मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी,श्री सिध्दिविनायक ट्रस्ट,टाटा ट्रस्ट यांसारख्या विविध ट्रस्टच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी
वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष,डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या माध्यमातून मा. बाळासाहेब ठाकरे साहेब,धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेतून आणि संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब,खा.डॉ.श्रीकांत शिंदे साहेब,मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे विशेष कार्यअधिकारी तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे osd मंगेश चिवटे कक्ष प्रमुख मा. रामहरी राऊत व सह कक्ष प्रमुख माउली घुळगंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज ठाणे येथे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या तासगाव कवठेमहांकाळच्या कक्ष प्रमुख पदी सचिन ज्ञानेश्वर शेटे यांना पत्र देऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.यावेळी कक्ष प्रमुख राम राऊत यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.सदर प्रसंगी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्य समन्वयक गौरव गुळवणी,पूर्व विदर्भ प्रमुख सचिन डाखोरे,लौकिक खेराडकर,अथर्व जोशी,नितीन हिलाल व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.